Перейти к содержимому

१६८ तासांचा उपवास: माझा प्रयोग, Autophagy आणि उपवासामागचं विज्ञान | डॉ अविनाश सावजी

Prayas Amravati

0:00 / 0:00

१६८ तासांचा उपवास: माझा प्रयोग, Autophagy आणि उपवासामागचं विज्ञान | डॉ अविनाश सावजी

32 060 просмотров · 1 дн. назад
Prayas Amravati
7,55 тыс. подписчиков
32 060 просмотров · 1 дн. назад
🙏 उपवासाचे फायदे: शरीराची स्वच्छता आणि मनाचा आत्मविश्वास उपवास कसा करावा आणि उपवासाचे फायदे काय? "मी 6 तासही उपाशी राहू शकत नाही" असं वाटणाऱ्या MBBS विद्यार्थ्यापासून 168 तासांच्या उपवासापर्यंतचा माझा प्रवास. 2016 चं नोबेल पारितोषिक मिळालेलं Autophagy संशोधन सांगतं की उपवासाने शरीरातली स्वच्छता यंत्रणा क्रियाशील होते. सुरुवात सोपी ठेवा: रोज 16 तासांचा उपवास (Intermittent Fasting), मग फळांचा उपवास, ज्यूस उपवास आणि हळूहळू पाण्यावरचा उपवास. ⚠️ 3 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त उपवास, विशेषतः डायबिटीस किंवा इतर आजार असल्यास, डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच करा. या नवरात्रीत तुमच्या क्षमतेनुसार एक पाऊल पुढे टाका आणि तुमचा उपवासाचा अनुभव comment मध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ कुटुंबासोबत शेअर करा. डॉ. अविनाश सावजी ===== अन्न परम औषधम ! डॉ अविनाश सावजी (आपला आहार योग्य असेल तर बहुधा आपल्याला डॉक्टरची गरज भासणार नाही.) हा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या लिंकवर क्लिक करावे.    • अन्न परम औषधम ! डॉ अविनाश सावजी (आपला आहार...   ========= डॉ अविनाश सावजी संचालक, प्रयास, अमरावती.(GMC Nagpur 1978 batch) सिंदखेडराजासारख्या एका लहानशा गावातून, सामान्य कुटुंबातील डॉ. अविनाश हे 10-12 व्या वर्गात नागपूर बोर्डात गुणवत्ता यादीत होते. GMC नागपूरला, MBBS अंतिम वर्षात पण पहिल्या 10 मध्ये उत्तीर्ण. आपल्या ज्ञानाचा उपयोग पैसे कमविण्याकरता न करता गरजू लोकांसाठी करायचे ठरवून, पुढचे विद्यापीठाचे शिक्षण थांबविले. सुरुवातीचे २३ वर्षे छोट्या गावात राहून, आदिवासी व ग्रामीण लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्य केले. आता २६ वर्षांपासून जीवनशैली व आरोग्य या विषयाला घेऊन कार्यरत. स्वतःच्या अभ्यास व अनुभवाच्या आधारे Preventive Cardiologist, Diabetologist, lifestyle medicine expert अशी लोकांमध्ये ओळख निर्माण केलेली. अत्यंत प्रभावशाली वक्तृत्व, संपूर्ण राज्य व देशविदेशातही कमविलेला खूप मोठा लोकसंग्रह, हजारो तरुणांचे mentor, अनेक संस्था संघटनांचे मार्गदर्शक, असे अत्यंत बहुआयामी विचारवंत व अभ्यासू व्यक्तित्व. हजारो जाहीर व्याख्याने, ५००० पेक्षाही जास्त शाळा महाविद्यालयातील लाखो विद्यार्थी व हजारो शिक्षक - प्राध्यापकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन. 1. सुजाण पालकत्व 2. यशस्वी व्हा 3. जगायचे का व कशासाठी 4. नाती घट्ट करू या 5. राग व अहंकाराचे व्यवस्थापन 6. व्हिजन 2045- वीस वर्षानंतर मी कुठे असेल व तिथे पोहचण्यासाठी आज मला काय करायला पाहिजे 7. शतायुषी व्हा 8. आरोग्यदायी जीवनशैली अशा विविध जीवनोपयोगी विषयावर शेकडो व्याख्याने - कार्यशाळा - प्रशिक्षणे घेतलेली. डायबिटीस ब्लड प्रेशर थायरॉईड लठ्ठपणा अस्थमा हार्ट अटॅक गुडघे व पाठदुखी संधिवात व इतरही अनेक ऑटो इम्युन आजार जे एरव्ही कधीच बरे न होणारे व वाढतच जाणारे मानले जातात, ते पण पूर्णपणे रिव्हर्स करता येतात, औषधे बंद करता येतात हे अलीकडील अनेक संशोधनातून सिद्ध झालेले आहे. अशाच प्रकारचा प्रयोग डॉ अविनाश सावजी व त्यांची टीम, ऑनलाईन पद्धतीने गेल्या सहा वर्षांपासून करीत आहेत. 4000 पेक्षाही जास्त रुग्णांचे अनुभव त्यांच्या गाठीशी आहेत. आतापर्यंत अमेरिकेसह इतर 16 देशांमधील व आपल्या देशातील 18 राज्यांमधील... आणि महाराष्ट्रातील बहुतेक सर्वच जिल्ह्यांतील हे रुग्ण आहेत. यामध्ये मिळणारे परिणाम हे कुठल्याही औषधांशिवाय व फक्त जीवनशैलीत काही बदल करून मिळालेले आहेत. ती आरोग्यदायी जीवनशैली नेमकी काय आहे व तिचा उपयोग आपण आपल्या स्वतःसाठी, कुटुंबीयांसाठी, याबाबत ते विविध कार्यक्रमात मार्गदर्शन करत असतात. बायपास/अँजिओप्लास्टी न करता, केवळ जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल करून, हृदयाच्या रक्तवाहिन्यामधील blockages दूर करता येतात, या संशोधनावर आधारित आरोग्यदायी जीवनशैली, गेल्या २५ वर्षात, डॉ. अविनाश सावजी हे लाखो लोकांपर्यंत घेऊन गेले आहेत. असे करणाऱ्या आपल्या देशातील सुरुवातीच्या काही निवडक डॉक्टरपैकी ते एक आहेत. ----------- www.prayasngo.net अधिक माहितीसाठी : प्रयास हेल्पलाईन क्र. 9021591789 WhatsApp 9420722107 http://prayasngo.net/ - - - - - - - - - - - - - - - - - - Please subscribe to our Channel :    / @prayasamravati   Connect with Dr. Avinash Saoji at: -- LinkedIn: https://www.linkedin.com/in/avinash-s... -- Facebook:   / dr.avinashsaojiprayas