Перейти к содержимому

श्रींचे पालखीचे पंढरपूर कडे प्रस्थान वर्ष 57 | Shri Gajanan Maharaj Palkhi Sohala 2026 | Shegaon

श्रींचा पालखी सोहळा

0:00 / 0:00

श्रींचे पालखीचे पंढरपूर कडे प्रस्थान वर्ष 57 | Shri Gajanan Maharaj Palkhi Sohala 2026 | Shegaon

48 249 просмотров · 3 месяца назад
श्रींचा पालखी सोहळा
158 тыс. подписчиков
48 249 просмотров · 3 месяца назад
शेगांवीचा राणा माहेरी निघाला | संगे संतमेळा भजनी रंगला || लक्ष लक्ष कंठातूनी गावूनी अभंग | चंद्रभागा दंग झाली गजानन गजानन || निज ज्येष्ठ शु.७ रविवार दि.२१/०६/२०२६ रोजी श्रींचे पालखीचे श्रीक्षेत्र पंढरपूर पायी वारी करीता प्रस्थान झाले. श्रींचे पालखीचे दि. २१ जून २०२६ रोजी सकाळी ठीक ७:०० वाजता श्री क्षेत्र शेगाव येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे अत्यंत भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात भव्य प्रस्थान झाले. ज्ञान, भक्ती आणि सेवाभावाचा संदेश देत ही पवित्र पालखी बुलढाणा, अकोला, वाशीम, हिंगोली, परभणी, बीड, धाराशिव (उस्मानाबाद) आणि सोलापूर या प्रमुख जिल्ह्यांमधून प्रवास करीत लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र पंढरपूरकडे मार्गक्रमण करणार आहे. दि. २३ जुलै २०२६ रोजी श्रींची पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथे आगमन करणार असून, दि. २३ जुलै ते २८ जुलै २०२६ या कालावधीत पंढरपूर येथे मुक्काम राहील. त्यानंतर दि. २८ जुलै २०२६ रोजी श्रींची पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथून शेगावकडे परतीच्या प्रवासासाठी प्रस्थान करेल. सुमारे दोन महिन्यांच्या या पवित्र पदयात्रेनंतर दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी श्रींचे श्री क्षेत्र शेगाव येथे स्वगृही भव्य, दिव्य आणि उत्साहपूर्ण आगमन होणार आहे. श्रींचा पालखी सोहळा (वर्ष ५७ वे) #gajananmaharaj #shegaon #श्रीगजाननमहाराजसंस्थानशेगांव #श्रींचापालखीसोहळा