Перейти к содержимому

अमरावती अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह! डॉग स्क्वॉड तैनात, कडक पोलीस बंदोबस्त

City News Channel

0:00 / 0:00

अमरावती अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह! डॉग स्क्वॉड तैनात, कडक पोलीस बंदोबस्त

601 просмотр · 5 ч назад
City News Channel
393 тыс. подписчиков
601 просмотр · 5 ч назад
अमरावतीचे ग्रामदैवत श्री अंबादेवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव उत्साहात सुरू आहे. नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता अभिषेकानंतर मंदिराचे प्रवेशद्वार खुले करण्यात आले, तर सकाळी साडेसहा वाजता देवीची आरती पार पडली. या आरतीला शेकडो भाविकांनी उपस्थिती लावली. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर संस्थानकडून दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा, मेटल डिटेक्टर आणि बॅरिकेड्सच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दुसरीकडे, डॉग स्क्वॉड आणि बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून मंदिर परिसराची तपासणी करण्यात आली. नवरात्रोत्सवादरम्यान भजन कल्लोळ आणि प्रवचनमालेचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. १९ ऑक्टोबर रोजी नवचंडी याग, तर २० ऑक्टोबर रोजी पारंपरिक सीमोल्लंघन मिरवणूक आयोजित करण्यात येणार आहे. अमरावती आणि विदर्भातील ताज्या बातम्यांसाठी City News Channel ला Subscribe करा. वेबसाइट: www.citynewschannel.net #Amravati #AmbadeviTemple #Navratri2026 #NavratriCelebration #CityNews