जॉन लॉक : नैसर्गिक अधिकाराचा सिद्धांत
SCSCO POL- SCI. Dr. Dhoble D. B.
0:00 / 0:00
जॉन लॉक : नैसर्गिक अधिकाराचा सिद्धांत
691 просмотр · 6 л. назад
SCSCO POL- SCI. Dr. Dhoble D. B.
1,14 тыс. подписчиков
691 просмотр · 6 л. назад
जॉन लॉक नैसर्गिक अधिकाराच्या सिद्धांताचा कट्टर पुरस्कर्ता होता.लॉकचे संपूर्ण तत्त्वज्ञान नैसर्गिक हक्क सिद्धांत भोवती फिरते. माणूस म्हणून जन्म घेतल्यामुळे माणसाला निसर्गतः अधिकार मिळतात त्याला नैसर्गिक अधिकार असे तो म्हणतो. निसर्गतः माणसाला खालील तीन प्रकारचे अधिकार मिळतात.
1. जीवन जगण्याचा अधिकार
2. स्वातंत्र्याचा अधिकार
3. संपत्तीचा अधिकार
या अधिकारांचे संरक्षण करण्याची जबाबदारी राज्याने घेणे गरजेचे आहे.
बी.ए. तृतीय वर्ष (सेमिस्टर पाचवे)
विषय- राज्यशास्त्र
पेपर- पाश्चिमात्य राजकीय विचारवंत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार पश्चिमात्य राजकीय विचारवंतांमध्ये जॉन लॉक हा एक पाचवा राजकीय विचारवंत अभ्यासक्रमामध्ये आहे. जॉन लॉक इंग्लंड मध्ये जन्माला आला. तो काळ इंग्लंड मधील गृह युद्धाचा काळ होता. राजा आणि संसद यांच्यामधला संघर्षाचा तो कालखंड होता. या संघर्षामध्ये जॉन लॉक ने संस्थेचे समर्थन केले होते. संसदेच्या समर्थनासाठी जॉन लॉकने आपल्या राजकीय तत्त्वज्ञानामध्ये मांडणी केली आहे आणि आपल्या तत्वज्ञानाला आधार मिळवून देण्यासाठी त्यांनी राज्याच्या उत्पत्तीचा सामाजिक कराराचा सिद्धांत सांगितला. समाजीक करार सिद्धांतांच्या आधारेच प्रतिनिधिक लोकशाहीचे समर्थन त्यांनी केली आहे. राज्याची निर्मिती ही लोकांनी सामाजिक करारातून केली. करारातून निर्माण झालेले राज्य हे प्रतिनिधिक लोकशाही चे असेल आणि ते जनतेच्या इच्छेनुसार चालणारे असेल. मानवाला मिळालेले नैसर्गिक अधिकार रक्षण करण्याची जबाबदारी राज्यांची असेल ही जबाबदारी राज्य व्यवस्थित पार पाडत नसेल तर लोकांना राज्याच्या विरुद्ध विद्रोह करण्याचा अधिकारही असला पाहिजे अशी आग्रही भूमिका जॉन लॉक ने आपल्या तत्त्वज्ञानात मांडली आहे. जॉन लॉक ने आपल्या तत्त्वज्ञानात राज्याचे उत्पत्तीचा सामाजिक करार सिद्धांत, नैसर्गिक अधिकारांचा सिद्धांत आणि जॉन लॉक ची व्यक्तिवादी भूमिका हे तीन विचार महत्त्वाचे आहेत. हे तिन विचार बघण्यासाठी खालील व्हिडिओ आपल्याला उपयुक्त ठरतील.
1. जॉन लॉक चा सामाजिक करार सिद्धांत
• जॉन लॉक : सामाजिक करार सिद्धांत
2. जॉन लॉकचा नैसर्गिक अधिकारांचा विचार
• जॉन लॉक : नैसर्गिक अधिकाराचा सिद्धांत
3. जॉन लॉक : व्यक्तिवादी विचारवंत
• जॉन लॉक : व्यक्तिवादी विचारवंत