Pune Crime: Patil Family ला एका रात्रीत संपवलं, 27 वर्ष खटला, पण आरोपींची निर्दोष मुक्तता कशी झाली ?
BolBhidu
0:00 / 0:00
Pune Crime: Patil Family ला एका रात्रीत संपवलं, 27 वर्ष खटला, पण आरोपींची निर्दोष मुक्तता कशी झाली ?
112 820 просмотров · 1 месяц назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
112 820 просмотров · 1 месяц назад
#BolBhidu #pune
ठिकाण पुणे, साल १९९७. मे महिना. पुणे रेल्वे स्टेशनवर एक कुटुंब उतरलं, हुबळीवरुन पुण्यात आलेलं पाटील कुटुंबीय. रमेश पाटील, त्यांच्या पत्नी विजया, मुलगी पूजा, मुलगा मंजुनाथ. रमेश पाटील हुबळीच्या एसबीआय बँकेत कामाला होते, त्यांची पुण्यात बदली झाली होती, त्यांच्या पत्नी विजया पोस्टात कामाला त्यामुळे सगळं गणित अगदीच व्यवस्थित. ९ मे १९९७ ला हे कुटुंबीय पुण्यात आलं, १२ मे ला ते पुण्यातल्या उच्चभ्रू कल्याणीनगर भागात एका प्रशस्त इमारतीमध्ये रहायला गेले, १६ मेच्या सकाळी त्यांचे मृतदेह सापडले, त्यांच्याच घरात. या चौघांचा खून झाला होता, त्यांच्या घरी दरोडा पडला होता. पोलिसांनी तातडीने सूत्र हलवली आरोपींना अटक झाली, यातल्या महिला आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झाली, तर दोन पुरुष आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. खालच्या कोर्टातून वरच्या कोर्टात मॅटर गेलं आणि डिसेंबर २०२४ मध्ये तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. अब्बास मस्तानच्या पिक्चरला लाजवेल असा ड्रामा कोर्टरुममध्ये घडला आणि २७ वर्ष चर्चेत राहिलं पुण्यातलं पाटील हत्याकांड. ही स्टोरी त्याच घटनेची, खटल्याची, पाटील हत्याकांडाची.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/