Перейти к содержимому

कोट्यवधींची कॅश, धारदार शस्त्र आणि एका नावाची चर्चा, Sambhaji Nagar चा Don Baba Farzan कोण होता ?

BolBhidu

0:00 / 0:00

कोट्यवधींची कॅश, धारदार शस्त्र आणि एका नावाची चर्चा, Sambhaji Nagar चा Don Baba Farzan कोण होता ?

103 884 просмотра · 1 мес. назад
BolBhidu
2,89 млн подписчиков
103 884 просмотра · 1 мес. назад
#BolBhidu #Sambhajinagar #BabaFarzan 10 जुलैला छत्रपती संभाजीनगरच्या छावणी पोलिस स्टेशनच्या पथकानं पडेगाव भागातल्या एका टाईट सिक्योरिटी असलेल्या बंगल्यावर धाड टाकली. या बंगल्यात रायफलपासून कुकरीपर्यंत धारदार शस्त्र, 21 लाखांचं सोनं, 8 लाखांची चांदी, 45 विदेशी दारूच्या बाटल्या आणि कोट्यवधी रुपयांची कॅश एवढं मोठं घबाड सापडलं. मग ह्या बंगल्याच्या मालकाचं नाव ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. 15 जून 2026 ला संभाजीनगरात बाबा फर्जन नावाच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तोच बाबा फर्जन या बंगल्याचा मालक होता. बाबा फर्जनचा दरारा एवढा होता की, एखाद्याला निवडून यायचं असेल तर आधी बाबाच्या बंगल्यावर जावं लागायचं. नाही गेला तर निकालात त्याचा टांगा पलटी व्हायचा. MIDC मधल्या सगळ्या कंपन्यांत बाबाचाच शिक्का चालायचा. जमीन खरेदी आणि विक्री करायची असली तर बाबा फर्जनची परवानगी लागायची. त्याच्या दरबारात येणारा एकही माणूस रिकाम्या हातानं जात नव्हता. पण एक चूक झाली आणि बाबा फर्जनची दहशत संपली. त्याच्याकडं पैसा तर होता, पण मरताना त्याच्याजवळ कुटुंबातलं कुणीच नव्हतं. संभाजीनगरमध्ये त्याच्या बंगल्यातून हे घबाड सापडल्यानंतर या डॉन बाबा फर्जनचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय. बाबा फर्जन नक्की कोण होता, संभाजीनगरात त्याची दहशत कशी होती, त्याचीच स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/