पवन सोळवंडे खुनप्रकरणी दोघे संशयीत ताब्यात.!
CITY NEWS KARAD
0:00 / 0:00
पवन सोळवंडे खुनप्रकरणी दोघे संशयीत ताब्यात.!
145 380 просмотров · 7 л. назад
CITY NEWS KARAD
16,5 тыс. подписчиков
145 380 просмотров · 7 л. назад
कराड शहरात गँगवॉरन पुन्हा डोकं वर काढलंय. खंडणीच्या वादातून मंगळवारी मध्यरात्री पवन सोळवंडेचा खून करण्यात आला. त्यानंतर वाहनांची मोडतोड व जाळपोळ करण्यात आली. या घटनेनंतर कराड शहरात अघोषित बंद आहे. दुकाने बंद असल्यानं बाजारपेठेत शुकशुकाट आहे. शाळांनाही सुट्टी देण्यात आली. शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. दरम्यान, सकाळी पवन सोळवंडे याच्या खुन्याला त्वरित अटक करावी, या मागणीसाठी शेकडो महिला आणि नागरिकांनी शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. जोपर्यंत गुन्हेगारांना अटक करत नाही तोवर पवनचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याच त्यांनी पोलिसांना ठणकावून सांगितलं. त्यामुळं दुपारी उशिरापर्यंत कराड पोलीस ठाण्यासमोर हे सर्वजण ठिय्या मांडून बसले. त्यानंतर या प्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यावेळी आंदोलन मागे घेऊन मृतदेह ताब्यात घेण्यात आला. दरम्यान या सर्व घडामोडींबाबत कराडचे डीवायएसपी नवनाथ ढवळे यांनी पत्रकारांना सविस्तर माहिती दिली.