विठ्ठल म्हणे रुक्मिणीला... जनी आहे आपली लेक | संत जनाबाई भक्तिगीत 2026 | Muktrang Music
Muktrang Music
0:00 / 0:00
विठ्ठल म्हणे रुक्मिणीला... जनी आहे आपली लेक | संत जनाबाई भक्तिगीत 2026 | Muktrang Music
71 869 просмотров · 3 мес. назад
Muktrang Music
20,8 тыс. подписчиков
71 869 просмотров · 3 мес. назад
🙏 विठ्ठल म्हणे रुक्मिणीला... जनी आहे आपली लेक... 🙏
संत जनाबाईंचे विठ्ठलावर अपार प्रेम... जनीसाठी स्वतः दळण दळणारा, पाणी भरणारा पांडुरंग पाहून रखुमाई विठ्ठलाला विचारते — “जनीचे तुम्ही एवढे लाड का करता?”
आणि विठ्ठल उत्तर देतो...
“जनी आहे आपली लेक,
या अवघ्या त्रिभुवनात,
तिच्यासारखी नाही एक!”
विठ्ठल-रुक्मिणीचा हळवा संवाद आणि संत जनाबाईंची निरागस भक्ती सांगणारे मुक्तरंग म्युझिकचे नवीन भक्तिगीत. 🎵🙏
🎵 गीताचे बोल | Lyrics
विठ्ठल म्हणे रुक्मिणीला...
जनी आहे आपली लेक,
या अवघ्या त्रिभुवनात,
तिच्यासारखी नाही एक!
रुक्मिणीने विचारले, रुसूनिया सावळ्याला
कसला असा मोह झाला, पंढरीच्या रायाला?
दळण तिचे दळता तुम्ही, पाणी तिचे भरता
त्रैलोक्याचे नाथ असून, कामे दासीची करता?
हसूनिया पांडुरंग, बोले रखुमाईला
आईचे गं काळीज तुझे, का न कळे तूजला?
पोरकी ती नाही जगात, मीच तिचा बाप गं
लेकीसाठी राबताना, कष्ट कसले वाटती गं?
जात्यावरच्या ओवीमध्ये, साद मला घालते
शेण्या-गौऱ्या वेचताना, माझ्या संगे चालते
भक्ती तिची निरागस, जणू दुधावरची साय गं
मीच तिचा बाप आणि तूच तिची माय गं!
ऐकूनिया शब्द देवाचे, माऊली ती गहिवरली
जनीच्या त्या प्रेमापोटी, रुक्मिणीही बावरली
म्हणे, चला पंढरीराया, जाऊ तिच्या झोपडीला
माय होऊन आज मीच, घास भरवते लेकीला!
🎵 गीत : जनी आहे आपली लेक
🙏 विषय : संत जनाबाई | विठ्ठल-रुक्मिणी संवाद
🎶 प्रकार : मराठी भक्तिगीत
🎼 Presented by : MUKTRANG MUSIC
गीत आवडल्यास Like 👍 करा, Share करा आणि YouTube वर MUKTRANG MUSIC चॅनेल Subscribe करा. 🔔
राम कृष्ण हरी 🙏
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल 🚩
Disclaimer:
We create and produce music content only. Music production may include AI-assisted technology. This content is made for entertainment and devotional purposes only.
Lyricist & Concept by Sunil Dhepe, Music created via Suno AI (Commercial License)"
#SantJanabai #VitthalRukmini #JaniAaheAapliLek #VitthalBhakti #MarathiDevotionalSong #Pandurang #MarathiBhaktiGeet #MuktrangMusic