Перейти к содержимому

मग माझा जीव तुझ्या वाटेवर । सुरेश भट । सदारकर्ते वैभव जोशी । स्पृहा जोशी । खजिना

गवाक्ष

0:00 / 0:00

मग माझा जीव तुझ्या वाटेवर । सुरेश भट । सदारकर्ते वैभव जोशी । स्पृहा जोशी । खजिना

43 419 просмотров · 5 лет назад
गवाक्ष
3,75 тыс. подписчиков
43 419 просмотров · 5 лет назад
मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल ! अन्‌ माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल ! मी फिरेन दूर दूर तुझिया स्वप्नांत चूर तिकडे पाऊल तुझे उंबऱ्यात अडखळेल ! विसरशील सर्व सर्व आपुले रोमांचपर्व पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळहुळेल ! सहज कधी तू घरात लावशील सांजवात माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल ! जेव्हा तू नाहशील, दर्पणात पाहशील, माझे अस्तित्व तुझ्या आसपास दर्वळेल ! जेव्हा रात्री कुशीत माझे घेशील गीत, माझे तारुण्य तुझ्या गात्रांतुन गुणगुणेल ! मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल ! सुरेश भट