CJPच्या ‘जेल भरो’ आंदोलनाला पोलिसांची परवानगी नाही; वसईचे वकील म्हणाले, कायदेशीर लढा देणार!
HP Live News
0:00 / 0:00
CJPच्या ‘जेल भरो’ आंदोलनाला पोलिसांची परवानगी नाही; वसईचे वकील म्हणाले, कायदेशीर लढा देणार!
1 130 просмотров · 11 ч назад
HP Live News
305 тыс. подписчиков
1 130 просмотров · 11 ч назад
CJP Jail Bharo Protest: Mumbai Police Deny Permission, Vasai Lawyers Ready for Legal Support
वसई : मुंबईतील शिवाजी पार्क येथे २ ऑक्टोबर, गांधी जयंतीच्या दिवशी CJP अर्थात कॉकरोच जनता पार्टीने जाहीर केलेल्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र, CJPचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आंदोलन मागे घेतलेले नसून, परवानगी नसतानाही ‘जेल भरो आंदोलन’ करण्याची भूमिका घेतली आहे.
या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल झाल्यास वसईतील वकील त्यांच्या मदतीसाठी मुंबईत धाव घेणार आहेत. वसई वकील संघटनेने संबंधित कार्यकर्त्यांना विनामूल्य कायदेशीर मदत देण्याची तयारी दर्शवली आहे.
मुंबई पोलिसांनी शिवाजी पार्क येथील आंदोलनाला परवानगी नाकारताना उच्च न्यायालयाचे निर्देश, परिसरातील नियम, वाहतुकीवर होणारा संभाव्य परिणाम आणि कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यांचा आधार घेतल्याचे वृत्त आहे.
CJPने हे आंदोलन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आयोजित केले असून, त्यांच्या राजीनाम्यासह निवडणूक प्रक्रियेशी संबंधित काही मागण्या मांडल्या आहेत.
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा बंदोबस्त आणि बॅरिकेडिंग करण्यात आल्याचे वृत्त आहे.
Byte: Adv. Digamber Desai
या संपूर्ण प्रकरणातील ताज्या घडामोडी आणि कायदेशीर भूमिकेसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.
HP Live News
स्थानिक आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी Subscribe करा.
#CJP #CJPProtest #JailBharo #ShivajiPark #MumbaiPolice #MumbaiNews #GandhiJayanti #October2 #AbhijitDipke #DigamberDesai #Vasai #VasaiVirar #MaharashtraNews #Maharashtra #MumbaiProtest #LegalAid #ElectionCommission #GyaneshKumar #HPLiveNews
Subscribe YouTube channel For latest breaking news :
/ hanifmirrorhplive
HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com
Social Media Handles:
Facebook : https://www.facebook.com/groups/61288...
Facebook : / hpvasaivirar
You Tube : / @hplivenews
Twitter : https://twitter.com/home
Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig...
Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...