Перейти к содержимому

Eknath Shinde यांच्या घराबाहेरुन Ram Purnekar यांना उचललं, पोलीस ठाण्यात राडा, ठाण्यात काय घडलं ?

BolBhidu

0:00 / 0:00

Eknath Shinde यांच्या घराबाहेरुन Ram Purnekar यांना उचललं, पोलीस ठाण्यात राडा, ठाण्यात काय घडलं ?

43 675 просмотров · 7 ч назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
43 675 просмотров · 7 ч назад
#BolBhidu #PradeepPurnekarCase #RamPurnekar ठाण्यातील ठाकरे गटाचे मानपाडा विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला आता एक महिना होत आलाय. या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना अटक सुद्धा केली आहे. पण तरीही या प्रकरणावरुन होणारे राजकीय आरोप थांबत नाहीत. शिंदे गटाच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे हेच पूर्णेकरांच्या हत्येचे खरे मास्टरमाईंड असल्याचा आरोप पूर्णेकर कुटुंबीयांकडून करण्यात आलाय. यासाठी प्रदीप पूर्णेकरांचे पुत्र राम पूर्णेकर गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे पुरावे सादर करत आहेत. सोमवारी राम पूर्णेकर यांनी शिंदे पती-पत्नीला अटक करण्यासाठी पोलिसांना २४ तासांचा अल्टिमेटम दिला होता. पण पोलिसांनी त्यांना अटक न केल्यामुळे मंगळवारी पूर्णेकर कुटुंबीयांनी आक्रमक पवित्रा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर राम पूर्णेकरांनी ठिय्या द्यायचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी राम पूर्णेकर रडत पोलिसांना विनंती करत होते. पण तरीही पोलिस त्यांना घेऊन गेले. यानंतर प्रदीप पूर्णेकर यांच्या पत्नी सुद्धा आक्रमक झाल्या आणि त्यांनी थेट पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या दिला. यामुळे मंगळवारी ठाण्यात मोठा राडा झाल्याचं पहायला मिळालं. एकीकडे मिनाक्षी शिंदे यांची एसआयटीकडून चौकशी होत असताना पूर्णेकर कुटुंबीय मिनाक्षी आणि त्यांच्या पतीला अटक करण्यासाठी आक्रमक झाल्याने पूर्णेकर हत्या प्रकरण आता चांगलंच तापलंय. मंगळवारी ठाण्यात नक्की काय घडलं, राम पूर्णेकरांना पोलिसांनी ताब्यात घेण्यावरुन राडा कसा झाला, त्याचीच स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/