Перейти к содержимому

हरिश्चंद्रगड || Harishchandragad || केदारेश्वर मंदिर ||कोकणकडा|| तारामती शिखर ||Nashik|| Maharashtra

Kunal Bhoye

0:00 / 0:00

हरिश्चंद्रगड || Harishchandragad || केदारेश्वर मंदिर ||कोकणकडा|| तारामती शिखर ||Nashik|| Maharashtra

4 471 просмотр · 2 года назад
Kunal Bhoye
1,62 тыс. подписчиков
4 471 просмотр · 2 года назад
Bajrang Bharmal- 9923268949 हरिश्चंद्रगडावर जाण्याची एक वाट पाचनई मार्गे अहमदनगर जिल्ह्यातूनही आहे. यासाठी मुंबई-नाशिक हमरस्त्यावरील घोटी या गावी उतरावे. तिथून संगमनेर मार्गावरील राजूर या गावी जावे. राजूरवरून गडावर दोन मार्गांनी चढाई करता येते. • राजुर-पाचनई अशी बससेवा उपलब्ध आहे. हे अंतर सुमारे २९ कि.मी. पाचनई हे गडाच्या पायथ्याचे गाव असून येथून गड गाठण्यास सुमारे १.५ - २ तास लागतात. वाट फारच सोपी आहे. पाचनई गाव उंचावर असल्याने येथून गड गाठायला जास्त कष्ट पडत नाहीत. पाचनई ते हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर हे अंतर सुमारे 4 कि.मी. आहे. तारामती आणि रोहिदास अशी नावे जरी या सुळक्याची असली तरी त्यांचा अयोध्येशी संबंध नाही. महान ऋषी चांगदेव 14 व्या शतकात येथे ध्यान करीत असत. लेणी त्याच कालखंडातील आहेत. किल्ल्यावरील विविध बांधकामे आणि आजूबाजूच्या प्रदेशात अस्तित्वात असलेली बांधकामे येथे विविध संस्कृतींचे अस्तित्व दर्शवतात. नागेश्वर (खिरेश्वर गावातील), हरिश्चंद्रेश्वर मंदिरातील आणि केदारेश्वराच्या गुहेतील कोरीव कामावरून हा किल्ला मध्ययुगीन काळातील असल्याचे सूचित होते. कारण तो महादेव कोळी जमातीचा टोटेम म्हणून महादेवाशी संबंधित आहे. ते मोगलांच्या आधी गडावर नियंत्रण ठेवत होते. पुढे हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. 1747 मध्ये मराठ्यांनी ते ताब्यात घेतले. कोकणकडा: गडाच्या पश्चिमेकडे असलेला कोकणकडा हे या किल्ल्याचे सर्वांत मोठे आकर्षण आहे. तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा हा कडा मध्यभागी जवळजवळ ७५ फूट अंतर्वक्र आहे. कड्याच्या माथ्यावर झोपूनच (आणि जपूनच) याचे विराट रूप पहावे लागते. स्वच्छ हवा असली तर येथून कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो. हा कडा महाराष्ट्रातील सर्वांत उंच कडा आहे. हा कडा रोमन लिपीतील यू 'U' या अक्षराच्या आकाराचा आहे. हा इतर कड्यांसारखा ९० अंशात नसून अंतर्गोल आकाराचा आहे. समोरून बघितला तर नागाच्या फण्यासारखा दिसतो. तारामती शिखर: तारामती शिखर गडावरील व पुणे जिल्हातील सर्वात उंच शिखर आहे. त्याची उंची साधारणतः ४८५० फूट आहे. शिखराच्या पोटात एकूण सात लेणी आहेत या शिखरावरून समोरच दिसणारे जंगल, घाटावरचा आणि कोकणातील प्रदेश न्याहाळता येतात. शिखरावर जाताना वाटेत अनेक गोमुखे लागतात. माथ्यावर दोन-तीन शिवलिंगे आहेत.