कविवर्य फ. मु. शिंदे I F. M. Shinde. I आई कविता I
New Era Publishing House
0:00 / 0:00
कविवर्य फ. मु. शिंदे I F. M. Shinde. I आई कविता I
2 740 просмотров · 2 года назад
New Era Publishing House
13 тыс. подписчиков
2 740 просмотров · 2 года назад
फ. मु. शिंदे लिखित,
‘त्रिकाल’ काव्यसंग्रहानिमित्त
पुस्तक प्रकाशन सोहळ्यातील मनोगत
___________________________________________________________
कविता कायम जगण्याची प्रेरणा देते......
'मानवाच्या अंतर्मनाचा ठाव घेत काळजातून आलेली कविता जगण्याची प्रेरणा देते. फ. मुं. शिंदे यांच्या कविता त्रिकाल सत्य सांगणाऱ्या आहेत,' असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी केले. कवी फ. मुं. शिंदे यांच्या 'त्रिकाल' काव्यसंग्रहाचे प्रकाशन डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते झाले. कवी फ. मुं. शिंदे, लीलाताई शिंदे, विडंबनकार रामदास फुटाणे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, डॉ. रमेश वरखेडे, प्रा. डॉ. राजशेखर शिंदे या वेळी उपस्थित होते. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ आणि न्यू ईरा पब्लिशिंग हाउस यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
फ. मुं. शिंदे यांनी 'आई', 'मनासारखे जगण्यास आता मन होत नाही', 'खोटे चालते पुढे', 'पाय मोडला खऱ्याचा' व 'पी. डी. पाटील' या कविता सादर केल्या. साहित्यिक राजन लाखे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, वि. दा. पिंगळे, कवयित्री डॉ. संगीता बर्वे, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, सुनील महाजन, माधव राजगुरू, सतीश पिंपळगावकर या वेळी उपस्थित होते. प्रास्ताविक अमृता तांदळे यांनी केले. प्रांजली बर्वे यांनी स्वागतगीत सादर केले. प्रा. प्रतिमा चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.
___________________________________________________________
कवितासंग्रह : 'त्रिकाल'
कवी : फ. मु. शिंदे
264 पाने । 300 रुपये
Amazon : https://tinyurl.com/trikal
प्रकाशक : न्यु इरा पब्लिशिंग हाऊस, पुणे
पुस्तक मागवण्यासाठी संपर्क : 8010924951
___________________________________________________________
#marathiwriter #marathipustak #new_era #pune #books #poems #writer #trikal #fmshinde #P.D.Patil #dypatiluniversity #dpu #newerapublishinghouse #famushinde