आता हे करावंच लागेल l Sangamner 2.0 l Sangamner Municipal Corporation l Satyajeet Tambe
Satyajeet Tambe
0:00 / 0:00
आता हे करावंच लागेल l Sangamner 2.0 l Sangamner Municipal Corporation l Satyajeet Tambe
3 628 просмотров · 8 мес. назад
Satyajeet Tambe
459 тыс. подписчиков
3 628 просмотров · 8 мес. назад
आता हे करावंच लागेल..! ✊
आपले संगमनेर शहर हे आपल्या सर्वांचा अभिमान आहे. I Love Sangamner ही भावना केवळ शब्दांत न राहता कृतीतून दिसली पाहिजे. हे शहर स्वच्छ, सुरक्षित आणि सुसंस्कृत असावे, संगमनेर 2.0 ही संकल्पना प्रत्यक्षात साकार व्हावी ही आपली सामूहिक नैतिक जबाबदारी आहे. संगमनेरच्या उज्ज्वल व आश्वासक भविष्याचे केवळ साक्षीदार न राहता, त्या भविष्याचे शिल्पकार व्हावे, या ठाम संकल्पनेतून “आता हे करावंच लागेल” ही विशेष नागरिक चळवळ राबवण्यात येत आहे.
या मोहिमेच्या माध्यमातून आदर्श संगमनेरकर म्हणून आपली जबाबदारी ओळखून, ती एकजुटीने पार पाडण्याची हीच योग्य वेळ आहे. शहरातील सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये शिस्त, रस्ते व पदपथांची स्वच्छता, अतिक्रमणांबाबत स्पष्ट व जबाबदार भूमिका, कचरा व्यवस्थापन, जाहिरातींबाबत नियमांचे पालन तसेच पार्किंग व वाहतुकीची शिस्त या सर्व बाबींमध्ये आपण स्वतः पुढाकार घेऊन सकारात्मक बदल घडवूया.
चला तर मग, सर्वांच्या सहभागातून स्वच्छ, सुंदर आणि सुसंस्कृत संगमनेर घडवूया.
#संगमनेर_2_0
#I_Love_Sangamner