💐🙏 आदरणीय गौरू दादा यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान सेवेतून माणुसकीचा गौरव! 🙏💐
जनसेवा हीच ईश्वरसेवा सोशल फाउंडेशन
0:00 / 0:00
💐🙏 आदरणीय गौरू दादा यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान सेवेतून माणुसकीचा गौरव! 🙏💐
109 просмотров · 12 дн. назад
जनसेवा हीच ईश्वरसेवा सोशल फाउंडेशन
638 подписчиков
109 просмотров · 12 дн. назад
💐🙏 वाढदिवस सेवाकार्याचा… जनसेवेचा ध्यास जपणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा! 🙏💐
संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक, मंगळवेढा नगरपरिषदेचे नगरसेवक तथा बांधकाम सभापती मा. श्री. गौरीशंकर (दादा) बुरकुल यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील गरजू रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना सकाळचा उपमा वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
काही माणसं स्वतःच्या आनंदासाठी जगतात, तर काही माणसं इतरांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यातच आपला आनंद शोधतात… दादा हे त्यापैकीच एक! ❤️
समाजातील प्रत्येक घटकासाठी धावून जाणे, प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि गरजूंच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहणे, हीच दादांची खरी ओळख आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त गोशाळेत चारा वाटप, रक्तदान शिबिर, मातोश्री वृद्धाश्रमात अन्नदान, तसेच ‘मायबोली महाराष्ट्राची’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आणि भव्य नागरी सत्कार असे विविध उपक्रम राबविण्यात आले.
वाढदिवसानिमित्त समाजाला काहीतरी देण्याची भावना आणि सेवेतून आनंद शोधण्याची वृत्ती खरोखरच प्रेरणादायी आहे.
🎂💐 मा. गौरीशंकर (दादा) बुरकुल यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्या हातून अशीच जनसेवा घडत राहो, आपल्या कार्याचा वटवृक्ष अधिकाधिक विस्तारत राहो आणि आपल्या सेवाकार्यातून अनेक गरजूंच्या जीवनात आनंद फुलत राहो, हीच सदिच्छा! 🙏❤️
🌺 जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा! 🌺