🌺 आमदार मा.श्री. सचिनदादा कल्याणशेट्टी यांचे वाढदिवस अन्नदान करून सेवेतून साजरा! 🌺
जनसेवा हीच ईश्वरसेवा सोशल फाउंडेशन
0:00 / 0:00
🌺 आमदार मा.श्री. सचिनदादा कल्याणशेट्टी यांचे वाढदिवस अन्नदान करून सेवेतून साजरा! 🌺
67 просмотров · 1 дн. назад
जनसेवा हीच ईश्वरसेवा सोशल फाउंडेशन
638 подписчиков
67 просмотров · 1 дн. назад
🌺 वाढदिवसानिमित्त सेवेतून आनंदोत्सव! 🌺
नेहमीच जनतेच्या सुख-दुःखात धावून जाणारे, लोकांच्या प्रश्नांसाठी तत्पर असणारे अक्कलकोटचे लोकप्रिय आमदार मा. श्री. सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी एक आगळावेगळा उपक्रम राबवून वाढदिवस साजरा केला.
सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या गोरगरीब व गरजू रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना सकाळचा नाश्ता म्हणून शिरा, उपीट आणि केळी वाटप करण्यात आली. ❤️
जनसेवा हीच ईश्वरसेवा सोशल फाउंडेशन, मल्लिकार्जुन सेवाभावी संस्था आणि आपुलकी फाउंडेशन यांच्या माध्यमातून हा अन्नदान सेवेचा उपक्रम राबविण्यात येतो.
जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या सचिनदादांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनीही सेवाभावी भावनेतून गरजूंची सेवा करण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे.
वाढदिवस म्हणजे केवळ उत्सव नव्हे, तर आपल्या आनंदात गरजू आणि वंचितांनाही सहभागी करून घेण्याची सुंदर संधी. रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलवून साजरा केलेला हा वाढदिवस निश्चितच आगळावेगळा आणि अविस्मरणीय ठरला.
🎂 सचिनदादांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
🙏 अन्नदान हेच श्रेष्ठदान... सेवा हाच आमचा धर्म, मानवता हेच आमचे ध्येय!