बाहेरून साधा, आतून आलिशान | British Era Pathare Wada, Pachal, Rajapur
Atharva Hardikar
0:00 / 0:00
बाहेरून साधा, आतून आलिशान | British Era Pathare Wada, Pachal, Rajapur
125 934 просмотра · 2 дня назад
Atharva Hardikar
97,8 тыс. подписчиков
125 934 просмотра · 2 дня назад
श्री. गुंडोपंत पाध्ये (आपले गुंड्या मामा) यांच्या व्हिडिओच्या वेळी श्री. नंदू काका पळसुलेदेसाई यांच्याकडून मला पाचल येथील ऐतिहासिक पाथरे वाड्याबद्दल माहिती मिळाली. ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत मी या वाड्याला भेट दिली. पाचलमधील हे एक अत्यंत प्रतिष्ठित कुटुंब. नंदू काका आणि माझे या पाथरे मंडळींनी अत्यंत अगत्याने स्वागत केले.
मुंबईत स्थापत्य अभियंता (Civil Engineer) म्हणून कार्यरत असलेले निलेश पाथरे यांनी या व्हिडिओमध्ये आपल्याला त्यांच्या या ऐतिहासिक वाड्याची आणि कुटुंबियांची सविस्तर सफर घडवून आणली आहे. बाहेरून अतिशय साधा आणि पारंपरिक दिसणारा हा कोकणी वाडा आतून मात्र अत्यंत आलिशान आहे. आधुनिक सोयीसुविधांची भर घालत जुन्या वास्तुकलेचे सौंदर्य जपण्यात पाथरे कुटुंबियांनी साधलेला जुन्या आणि नव्याचा संगम खरोखरच थक्क करणारा आहे. मुंबईत कार्यरत असूनही गावच्या घराशी आणि मातीशी असलेली त्यांची अतूट नाळ निश्चितच कौतुकास्पद आहे.
हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कोकणातील या वास्तूचा तसेच पाथरे कुटुंबाचा हा प्रवास कसा वाटला, हे कमेंट करून नक्की सांगा.
पाथरे कुटुंबियांचे, श्री. नंदू काका पळसुलेदेसाई यांचे आणि व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार!
तुमच्या संपर्कात सुद्धा अशी भन्नाट माणसे किंवा पुरातन वास्तू असतील तर मला Email नक्की करा. चॅनलला सपोर्ट करण्यासाठी व्हिडिओ लाईक व शेअर करा आणि इच्छुक प्रेक्षक युपीआय आयडीचा वापर करून चॅनलला आर्थिक पाठबळ सुद्धा देऊ शकतात.
📍 लोकेशन (Location):
पाचल, तालुका - राजापूर, जिल्हा - रत्नागिरी (कोकण)
💳 चॅनलला सपोर्ट करण्यासाठी (UPI Support):
atharvahardikar@dbs
📩 बिजनेस आणि माहिती शेअर करण्यासाठी (Email):
atharvahardikar99@gmail.com
#AtharvaHardikar #Konkan #Kokan #PathareWada #Pachal #Rajapur #Ratnagiri #Heritage #WadaArchitecture #KonkanTourism #MarathiVlog #TraditionalHome #HeritageWada #CivilEngineering