आला माझा पंचशील नगरचा राजा | Ajay Shirishkar | Shweta Thakur | Ganesh Chaturthi #2026 #ganeshutsav
Ajay Shirishkar Official
0:00 / 0:00
आला माझा पंचशील नगरचा राजा | Ajay Shirishkar | Shweta Thakur | Ganesh Chaturthi #2026 #ganeshutsav
3 153 просмотра · 13 дней назад
Ajay Shirishkar Official
858 подписчиков
3 153 просмотра · 13 дней назад
!! श्री स्वामी समर्थ !!कुलस्वामिनी प्रसन्न !! आई तेजस्विनी प्रसन्न !!
🙏🌺 आला आला रे आला, माझा पंचशील नगरचा राजा! 🌺🙏
गणेश चतुर्थी २०२६ च्या मंगलमय पर्वानिमित्त श्री गणरायाच्या चरणी समर्पित एक सुंदर, भक्तिमय आणि उत्साहाने भरलेले गीत!
“आला आला रे आला, माझा पंचशील नगरचा राजा” या गीतातून आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे भक्तिभावाने स्वागत करूया. सजलेल्या दरबारात गणरायाचे आगमन होऊ दे आणि त्यांच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद नांदू दे. 🙏🌺
********************************
🎵 गाण्याचे अधिकृत श्रेय
सादरकर्ते:
सुनील बाळकृष्ण शेट्ये
प्रस्तुती:
हार्मनी म्युझिकल मेहफिल
(ममता इंदुलकर/ अजय शिरीषकर)
गीत: ममता योगेश गुजर - इंदुलकर
गायक: अजय सखाराम शिरीषकर
गायिका: श्वेता सुरेश ठाकूर
संगीत निर्मिती व संयोजन:
संचित हेमंत म्हात्रे व सचिन धुमाळ
संगीत रचना:
सचिन धुमाळ व संचित हेमंत म्हात्रे
बुलबुल तरंग:
रामचंद्र डी. वाघमारे
सॅक्सोफोन:
भूषण सूर्यकांत पाटील
तालवाद्य वादन:
प्रसाद मयेकर, तेजस सातार्डेकर व संचित हेमंत म्हात्रे
कोरस पार्श्वगायन:
शुभम कांबळी, धर्मी पटानी व दीपक चौधरी
प्रोग्रामिंग, मिक्सिंग व मास्टरिंग:
संचित हेमंत म्हात्रे
ध्वनिमुद्रण स्टुडिओ:
पंचामृत आर्ट्स स्टुडिओ
व्हिडिओ क्रेडिट्स
एस. पांचाळ मीडिया वर्क्स
(सुरज पांचाळ)
नृत्य कलाकार:
साईनाथ पुजारी
प्रियांका येरळकर
मनीष सैतवडेकर
हर्षदा कदम
मानसी उतेकर
गणेश भोसले
तन्वी राजेश ठाकूर
दीपेश राजेश ठाकूर
श्रावणी संतोष जाधव
ओंकार दत्तात्रय जाधव
आरुष सिद्धार्थ पिंगुळकर
अक्षरा संजय म्हात्रे
(रुद्र डान्स अकॅडमी)
विशेष सहकार्य
श्री गणेश मित्र मंडळ
(पंचशील नगर -२, प्रतिक्षा नगर)
अध्यक्ष: चंद्रकांत गोरीवले
सचिव: सुनील शेट्ये (आधारस्तंभ)
खजिनदार: जयदेव ठाकूर
आधारवड :
रेणुका सखाराम शिरीषकर
रत्नप्रभा सदानंद गुजर
प्रथम/तेजस्विनी
विशेष आभार :
स्नेहल सुनिल शेट्ये
शैलेंद्र सिंह
सुधीर शिरगावकर
(सुवर्णा हॉल)
रेणुकाआई सेवा फाउंडेशन
*************************
🎵 गीताचे बोल
नगरी ही आपली सोन्याने नटली
आनंद मावेना गगनात
बाप्पाची सावली हाकेला धावली
सुखाची उधळून बरसात
दाही दिशात हो ज्याचा गाजावाजा
तोड कुठे ही ना त्याच्या रुबाबाचा
ढोल ताशांचा जल्लोष नाद घुंगराचा
आल भक्तीला उधाण भक्तगणांच्या
ताल सुरांचा गुल्लाल उधळुया
आला आला हो आला माझा पंचशील नगराचा राजा- ४
***********************
सेवा संस्कार श्रद्धेचा साज
चढूऊया भक्तीभावाने हो आज
पाश, अंकुश घेऊन करात
मोठ्या थाटात बाप्पा विराज
पंचरत्नांची लावून ज्योत
आज करते तुझी आरती
जन्मोजन्मी घडावी ही सेवा
राजा तुझी रे पंचशीलात
चुकलेल्या दिशांची वाट रे तू
हरलेल्या मनाची आस रे तू
सुनील शेट्येनंच्या नवसाला पावला देव माझा
आला आला हो आला माझा पंचशील नगराचा राजा- ४
***********************
चंद्रकिरणाच्या पालखी संगती
आल्या बरसून श्रावणधारा
पाहता हसरा तुझा चेहरा
भासे आजच दिवाळी दसरा
शेट्ये दादांचा विश्वास होता
दिस सरणार दुःखाचे आता
तुझ्या करुणेचा सागर मोठा
काही मागणे उरले ना आता
सुखकर्ता दुःखहर्ता वंदन तुजला
तुझिया कृपेची छाया लाभो आम्हाला
भक्तांच्या हाकेला धाऊन आला
पंचशील नगरीचा मोरया माझा -
आला आला हो आला माझा पंचशील नगराचा राजा- ४
❤️ हे गाणे आवडल्यास:
👍 LIKE करा
💬 COMMENT करून तुमचा अभिप्राय द्या
🔄 SHARE करून आपल्या मित्र-परिवारापर्यंत पोहोचवा
🔔 Ajay Shirishkar Official हे YouTube चॅनेल SUBSCRIBE करा.
तुमच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे आम्हाला नवीन भक्तिगीते आणि संगीतनिर्मिती करण्याची प्रेरणा मिळते. ❤️🙏
🌺 गणपती बाप्पा मोरया! 🌺
🙏 मंगलमूर्ती मोरया! 🙏
❤️ पंचशील नगरचा राजा मोरया! ❤️