Перейти к содержимому

IAS Tukaram Mundhe: भारताचे Real Singham तुकाराम मुंढे यांची Unseen Story ।

Unseen Marathi

0:00 / 0:00

IAS Tukaram Mundhe: भारताचे Real Singham तुकाराम मुंढे यांची Unseen Story ।

1 192 просмотра · 1 месяц назад
Unseen Marathi
107 тыс. подписчиков
1 192 просмотра · 1 месяц назад
#UnseenMarathi #TukaramMundhe #MaharashtraFDA #IASOfficer अधिकारी म्हणून मोठं होणं म्हणजे नेमकं काय? प्रशासनात अधिकारी दोन प्रकारचे असतात. पहिल्या प्रकारात काही लोक विशिष्ट पदावर बसतात, म्हणून ते मोठे मानले जातात. तर दुसऱ्या प्रकारात असे अधिकारी येतात, जे कोणत्याही पदावर असोत.. ते त्या पदावर आहेत.. म्हणून त्या पदाचाच अर्थ आणि आवाका बदलतात. महाराष्ट्रात तुकाराम मुंढे हे नाव गेली दोन दशकं याच दुसऱ्या प्रकारासाठी चर्चेत आहे. नाशिक असो, सोलापूर, नवी मुंबई असो, पीएमपीएमएल, नागपूर असो नाहीतर आजचं अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच एफडीए असो. जिथे मुंढे तिथे नियम, शिस्त आणि प्रशासनाचा वेग याबाबत तडजोड होत नाही. पण आपल्याकडे जो कामात तडजोड करत नाही, त्याला आयुष्यात बऱ्याच तडजोडी कराव्या लागतात. प्रशासनात 21 वर्षांची कारकीर्द आणि त्यात 25 बदल्या. मात्र त्यांच्या कारकिर्दीची चर्चा करताना केवळ सतत बदल्या होणारे आयएएस अधिकारी असं म्हणणं चुकीचं ठरेल. कारण अधिकारी म्हणून त्यांचं मोठेपण त्यांच्या बदल्यांच्या संख्येत नाही. तर, प्रत्येक पोस्टिंगमध्ये एखादा अधिकारी किती काटेकोरपणे आणि कठोरपणे नियम लागू करतो, प्रत्येक पोस्टिंगमध्ये त्या पदाशी किती प्रामाणिक राहतो याच्याशी संबंधित आहे. प्रत्येक वेळी प्रस्थापित सिस्टीम बदलाला जागा देतेच असं नाही. मात्र तरीही कर्तव्याशी तडजोड न करता, स्वतःच्या आयुष्यात तडजोडी करणं त्यांनी स्वीकारलं. हीच गोष्ट आज देशातून त्यांच्या नावाचं गारुड कमी होऊ देत नाही. सध्या प्रश्न केवळ त्यांच्या नावाची इतकी चर्चा का होते हा उरलेलाच नाही. एकीकडे लोक सिस्टीमला नावं ठेवतात तर दुसरीकडे त्यांच्यासारखा अधिकारी सिस्टीममध्येच राहूनही कसं लढता येतं, याचा रोडमॅप बनवतो. ही गोष्ट आहे अधिकार आणि कर्तव्याच्या सीमारेषेवर उभ्या असलेल्या अधिकाऱ्याची. ही गोष्ट आहे व्यवस्थेशी जुळवून घेण्यापेक्षा व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची किंमत मोजणाऱ्या अधिकाऱ्याची. ‘तडजोड कुठपर्यंत करायची?’ याचं स्वतःच्या कारकिर्दीतून उत्तर देणाऱ्या तुकाराम मुंढेंची. आज आपण पाहणार आहोत 'The Uncompromising Officer' तुकाराम मुंढेंची अनसीन कहाणी. असेच व्हिडीओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन मिळेल. ‪@unseenmarathi‬ For more interesting content, Follow us on Instagram :   / unseen.marathi   Facebook :   / unseenmarathi