रानात गेलो अळंबी शोधायला 😍 | घरी येऊन बनवली अळंबीची भाजी - Ambavali, Mandangad (Konkan)
S FOR SATISH
0:00 / 0:00
रानात गेलो अळंबी शोधायला 😍 | घरी येऊन बनवली अळंबीची भाजी - Ambavali, Mandangad (Konkan)
633 406 просмотров · 5 лет назад
S FOR SATISH
423 тыс. подписчиков
633 406 просмотров · 5 лет назад
रानात गेलो अळंबी शोधायला 😍 | घरी येऊन बनवली अळंबीची भाजी - Ambavali, Mandangad (Konkan) कोकणात पावसाळ्यात रानात अळंबी म्हणजेच mushroom शोधायला आम्ही जातो. कोकणातील सर्वात महागडी भाजी म्हणून ओळखली जाणारी अळंबी जिला अलबी, रोवणे असे सुद्धा बोलतात. आमच्या गावी अलबी बोलतात. आषाढी एकादशीच्या वेळेस, म्हातारा पाऊस पडतो अशी माणसे बोलतात तेव्हा रानाला अळंबी भरपूर येतात. आमच्या गावच्या माणसांना तर अलब्यांचा पाऊस खास असतो तेसुद्धा माहिती आहे. अलब्या पाऊस पडला की दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून रानात जाऊन अळंबी शोधली जाते. वर्षा आणि मी अळंबी शोधायला सकाळी आमच्या रानात गेलो. भरपूर रानत शोधल्यावर अळंबी आम्हाला भेटली. पाऊस येऊन जाऊन होता. आम्ही रानात जेवण नेले होते. रानात जेवायची मजा भारी असते. आम्ही दोन ते तीन तास रानात अळंबी शोधली. आम्हाला एका वेळेला पुरेल एवढी अळंबी आम्ही शोधली. अलबी म्हणजे रोवणे शोधायला बराच वेळ लागतो. अळंबी भेटली तर भरपूर नाहीतर खाली हाताने घरी यावं लागतं. आम्ही घरी आलो तेव्हा आई अळंबी बघुन खुश झाली. आईने खास तिच्या पद्धतीने अळंबी साफ केली. अळंबी साफ कशी करतात हे आईने दाखवले आहे. आईच्या हातच्या जेवणाला चव खूप छान आहे. आईने सर्व अलंब्या साफ करून घेतल्या. पाण्यात धुवून कुस्करून घेतल्या. चुलीवर कांदा, लसूण, मिरची, टोमॅटोची फोडणी देऊन मस्त अलंबीची भाजी तयार केली. अळंबी भाजून सुद्धा खाल्ली जाते. वर्षा मी आणि प्रांजुने मीठ लावून चुलीत भाजलेली अळंबी खाल्ली. दुपारच्या जेवणात आम्ही अलंबीच्या भाजीचा आस्वाद घेतला. अळंबी आईच्या हातची खूपच छान झाली होती. Mushroom अळंबी रानात कशी शोधतात आणि अलंबीची भाजी कशी बनवली जाते हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #RanatGeloAlambiShodhayla #MushroomRecipe #AlambichiBhaji #sforsatish
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar