Перейти к содержимому

कथाकथनाने आणली शिक्षक साहित्य संमेलनात रंगत ; कोजिमने केले रसिकांच्या मनावर राज्य..

WARANA NEWS

0:00 / 0:00

कथाकथनाने आणली शिक्षक साहित्य संमेलनात रंगत ; कोजिमने केले रसिकांच्या मनावर राज्य..

230 просмотров · 7 дней назад
WARANA NEWS
4,64 тыс. подписчиков
230 просмотров · 7 дней назад
कथाकथनाने आणली शिक्षक साहित्य संमेलनात रंगत ; कोजिमने केले रसिकांच्या मनावर राज्य कोल्हापूर : अभिजात मराठी भाषा गौरव दिना निमित्त कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाच्या वतीने ( कोजिम ) दोन दिवशीय शिक्षक साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे . न्यू एज्युकेशन सोसायटीच्या गडकरी सभागृहात राज्यातील विविध जिल्ह्यातील तीनशेहून अधिक मराठी शिक्षक आणि साहित्य रसिकांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती . संमेलनाचे नेटके नियोजन करत कोजिमने रसिकांच्या मनावरती राज्य केले अशी चर्चा साहित्य रसिकांतून व्यक्त केली गेली . शनिवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता ग्रंथदिंडीने संमेलनास प्रारंभ झाला . सकाळी अकरा वाजता ज्येष्ठ लेखक, शिक्षण तज्ञ आणि विचारवंत प्राचार्य डॉक्टर सुनीलकुमार लवटे यांनी संमेलनाचे उद्घाटन केले . कोजिमचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले . यावेळी न्यू एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रभाकर हेरवाडे, सहसचिव सूर्यकांत चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती . दुसऱ्या सत्रात शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर नंदकुमार मोरे यांच्या अध्यक्षते खाली मराठी भाषा : वर्तमान, आव्हाने आणि भविष्य या विषयावरती परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते . या परिसंवादामध्ये डॉक्टर दीपक पवार, मुंबई आणि प्रकाश परब, कुडाळ यांचा महत्वपूर्ण सहभाग होता . सायंकाळी पाच वाजता मारुती मांगोरे यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथनाचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये परशराम आंबी, अशोक पवार आणि अशोक शिर्के यांनी आपल्या अमोघ शैलीमध्ये भाकर चोर, सत्कार, मिटिंग आणि मारुती मांगोरे यांनी कोंबडी या कथांचे उत्कट सादरीकरण करून संमेलनाची हास्यरंगत वाढवली . तिसऱ्या सत्रात कोजिम सदस्यांनी सायंकाळी साडेसात वाजता महाराष्ट्राची लोकधारा हा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून आपल्यातील सुप्त गुणांचे सादरीकरण केले . पद्मिनी माने यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .उद्या रविवार दिनांक ४ ऑक्टोबर रोजी संमेलनाची सांगता होणार असून यामध्ये बी.एस. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कवीसंमेलन आयोजित करण्यात येणार असून यामध्ये कोजिमचे नामांकित शिक्षक कवी सहभागी होणार आहेत . सकाळच्याच पहिल्या सत्रात विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गझल कट्टा होणार असून नामांकित गझलकारांचा आस्वाद साहित्यरसिकांना घेता येणार आहे . दुसऱ्या सत्रात बालकुमार फौंडेशन प्रस्तुत शिक्षण विषयक कवितांचा सुंदर माझी शाळा हा सांगितिक जागर झाल्यानंतर दोन दिवशीय शिक्षक साहित्य संमेलनाचा समारोप होणार आहे . शिक्षक साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केल्याबदल प्रशासन अधिकारी जयश्री जाधव आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी गौरवोद्गार काढले . कोजिम मार्फत मान्यवर शिक्षकांचा यावेळी हृद्य सत्कार करण्यात आला . जयश्री पिंगळे यांनी आभार प्रदर्शन केले . यावेळी प्राध्यापक जयसिंग सावंत, राजेंद्र कोरे, सुलोचना कोळी, सीमा सुर्यवंशी, सदाशिव -हाटवळ, संजय सौंदलगे, राहूल टिपुगडे, रंगनाथ सुंबे आदी मान्यवर उपस्थित होते .