Перейти к содержимому

ससूनमध्ये काय घडलं!कर्मवीर भाऊराव पाटील शेवट| मन हेलावणारे प्रशांत देशमुखांचे व्याख्यान| education

Prashant Deshmukh

0:00 / 0:00

ससूनमध्ये काय घडलं!कर्मवीर भाऊराव पाटील शेवट| मन हेलावणारे प्रशांत देशमुखांचे व्याख्यान| education

2 445 просмотров · 7 дней назад
Prashant Deshmukh
8,61 тыс. подписчиков
2 445 просмотров · 7 дней назад
कर्मवीरांचा शेवटचा प्रवास | ससून हॉस्पिटलमध्ये काय घडलं? | व्याख्याते प्रशांत देशमुख नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त व्याख्यान नाही, हा एक हृदय पिळवटून टाकणारा अनुभव आहे. रयत शिक्षण संस्थेच्या पंढरपूर कॉलेजमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवन चरित्रावर बोलत असताना जेव्हा मी त्यांचा शेवटचा दिवस सांगितला, तेव्हा श्रोते भारावले आणि काहींच्या डोळ्यात पाणी आले . अनेकजण म्हणाले - "तुम्ही आम्हाला रडवलंत, भाऊरावांचे चरित्र माहिती होतं पण तुम्ही ज्या पद्धतीने शब्दातून चित्र उभं केलंत त्याने आम्ही हिलावून गेलो." 9 मे 1959 - ससून हॉस्पिटल, पुणे - नेमकं काय घडलं? कर्मवीर भाऊराव पाटील ससून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. त्यांनी त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना पत्र लिहिले - "महात्मा गांधी ग्रामीण विद्यापीठ स्थापन करण्याची माझी इच्छा होती, पण तब्येत साथ देत नाही, तुम्ही माझे हे स्वप्न पूर्ण करा आणि रयत शिक्षण संस्थेकडे स्वतः लक्ष द्या." 9 मे चा दिवस उजाडला. सकाळी 7 वाजता भाऊरावांनी लिंबू पाणी, मध घेतलं. ढकलगाडीने जायचं होतं पण ते म्हणाले "नाही, मी चालत जाईल, मला आत्मविश्वास जागृत झाला पाहिजे." वार्डात चालत गेले, लोकांनी नमस्कार केला. वर्तमानपत्र चाळली, टपाल बघितलं. दुपारी साडेबाराला डॉ. बोधे आले, पावणे एक वाजता परिचारिकेने इंजेक्शन दिलं आणि... भाऊराव अस्वस्थ झाले, डोळे लाल झाले, डॉक्टर धावले पण काही उपयोग झाला नाही. भाऊरावांचा आत्मा अनंतात विलीन झाला. आकाशवाणीवर बातमी झळकली - "शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील अनंतात विलीन झाले." पुढे सातार्‍यात काय झालं? आई गंगुबाईचा हंबरडा - "रोज मला विचारून जातोस, आज न विचारता कसा गेलास? लाखो पोरं तुझ्या भरोशावर सोडलीत, त्यांनी कुणाच्या तोंडाकडे पाहायचं?" आणि 10 मे ला शाहू बोर्डिंगच्या परिसरात चंदनाच्या चितेवर अखेरचा निरोप... हा व्हिडिओ प्रत्येक शिक्षक, विद्यार्थी आणि रयत प्रेमीने नक्की बघावा. माझे इतर महत्त्वाचे व्हिडिओ नक्की बघा (या व्हिडिओनंतर हे बघाच): 1) कान्होजी जेधे यांचा वाडा - (सर्वाधिक पाहिला गेलेला व्हिडिओ - लाखो लोकांनी पाहिला आहे)    • शिवरायांचे निष्ठावंत कान्होजी जेधे यांचा क...   2) शिवरायांची आग्र्याहून सुटका - थरारक प्रसंग    • शिवरायांची आग्र्याहून सुटका - शिवव्याख्यात...   3) कर्मवीर भाऊराव पाटील यांचे संपूर्ण जीवन चरित्र    • खडी फुटत नव्हती, शतकांचे जातिभेद फुटत होते...   4) रयत शिक्षण संस्था, सातारा माजी सचिव प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांची माझ्या व्याख्यानाविषयी प्रतिक्रिया    • असे व्याख्यान यापूर्वी झाले नाही! प्राचार्...   मुलाखत घेणाऱ्या / व्याख्याते प्रशांत देशमुख यांच्याविषयी: लेखक प्रशांत देशमुख हे महाराष्ट्रातील उत्तम व्याख्याते आहेत. शिवव्याख्याते आहेत. करियर मार्गदर्शक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जगणं सुंदर आहे, पसायदान, कर्मवीर भाऊराव पाटील, प्रतापगडचे युद्ध आणि शिवरायांची युद्धनीती, आग्र्याहून सुटका, पन्हाळ्याच्या वेढ्यातून पलायन, सुरतेवरील छापा, संत ज्ञानेश्वर माऊलींचे चरित्र, राजमाता जिजाऊंचे चरित्र या विषयांवरील त्यांची व्याख्याने अनेक व्याख्यानमालांमध्ये गाजत आहे. त्यांच्याकडून लिहिले गेलेले, इतिहासाचा वर्तमानाशी सांधा जोडणारे 'जय शिवराय' हे पुस्तक सध्या महाराष्ट्रात गाजत आहे. आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची प्रस्तावना त्या पुस्तकाला लाभली आहे. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांचे प्रशंसापत्रही त्या पुस्तकासाठी लाभले आहे. लेखक प्रशांत देशमुख यांचे 'गुड मॉर्निंग' हे पुस्तकही सध्या महाराष्ट्रात गाजत आहे. या पुस्तकाला राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कारही मिळाला आहे. सरनोबत नेताजी पालकर यांचे जन्मगाव असलेल्या चौक मध्ये लेखकांचे माध्यमिक शिक्षण झाले आहे. व्याख्याते प्रशांत देशमुख हातनोली - चौक, रायगड मो. 9822 650 280 *माझ्या चॅनलला Subscribe करा -* खालील लिंकवर क्लिक करा, तुम्हाला थेट Subscribe बटण येईल. 👉    / @prashantdeshmukh9492   तुम्हाला हा शेवटचा प्रसंग कसा वाटला? कमेंट मध्ये नक्की लिहा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. #KarmaveerBhauraoPatil #PrashantDeshmukh #TeacherMotivation #StudentMotivation #Shikshak #Vidyarthi #RayatShikshanSanstha #MarathiVyakhyan #SassoonHospital #SchoolSpeech #CollegeSpeech #PreranaDayak #KanhojiJedhe #AgraSutka #MarathiVyakhan #SassoonHospital