Перейти к содержимому

Shivendraraje Bhosale | शिवेंद्रराजे भोसले यांच्या पीडब्ल्यूडीच्या दारात वाहतेय भ्रष्टाचाराची गंगा

Lay Bhari News

0:00 / 0:00

Shivendraraje Bhosale | शिवेंद्रराजे भोसले यांच्या पीडब्ल्यूडीच्या दारात वाहतेय भ्रष्टाचाराची गंगा

384 просмотра · 1 день назад
Lay Bhari News
128 тыс. подписчиков
384 просмотра · 1 день назад
शिवरायांच्या कर्तृत्वाचा शिवेंद्रराजांच्या खात्याला विसर? PWD अधिकाऱ्याच्या दारातच पाणीगळती! आज पत्रकार तुषार खरात यांनी मुंबईतील वरळी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) कार्यालयाला भेट दिली. यावेळी कार्यकारी अभियंता स्वाती पाठक यांच्या दालनासमोर दोन बादल्या ठेवलेल्या दिसल्या. कार्यालयाच्या छतातून पाणी गळत असल्याने हे गळणारे पाणी साठवण्यासाठी त्या बादल्या ठेवण्यात आल्याचे घटनास्थळी दिसून आले. ज्या सार्वजनिक बांधकाम विभागावर सरकारी इमारती आणि रस्त्यांची उभारणी तसेच देखभालीची जबाबदारी आहे, त्याच विभागाच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्याच्या दालनाबाहेर अशी परिस्थिती दिसणे अनेक प्रश्न उपस्थित करते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाचीच अशी अवस्था असेल, तर नागरिकांसाठी बांधण्यात येणाऱ्या इमारती आणि इतर सार्वजनिक बांधकामांच्या गुणवत्तेबाबत काय प्रश्न निर्माण होतात? या विभागाची जबाबदारी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील स्थापत्यकलेचा आणि रायगडाच्या बांधकामाचा संदर्भ घेत, आजच्या सार्वजनिक बांधकाम व्यवस्थेबाबत या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील स्थापत्यकलेचा वारसा आणि आजच्या सार्वजनिक बांधकाम व्यवस्थेतील परिस्थिती यांची तुलना करताना प्रशासनाने या पाणीगळतीबाबत काय भूमिका घ्यावी? हे प्रश्न या निमित्ताने समोर येतात. व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा. लय भारी — खमकी भूमिका, खणखणीत आवाज.