Перейти к содержимому

बागलाण मधील औरंगगड पहिला का तुम्ही?।एकाच दिवशी केले तीन किल्ले ।बागलाण ट्रेक २०२६।हरगड।मुल्हेर।मोरा।

PUNEREE XPRESS

0:00 / 0:00

बागलाण मधील औरंगगड पहिला का तुम्ही?।एकाच दिवशी केले तीन किल्ले ।बागलाण ट्रेक २०२६।हरगड।मुल्हेर।मोरा।

1 561 просмотр · 8 мес. назад
PUNEREE XPRESS
496 подписчиков
1 561 просмотр · 8 мес. назад
बागलाण मधील औरंग गड पहिला का तुम्ही ?।एकाच दिवशी केले तीन किल्ले ।बागलाण ट्रेक २०२६।हरगड।मुल्हेर।मोरा। मुल्हेर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. मुल्हेर हा किल्ला डोलबरी पर्वत रंगांमध्ये किल्ल्याची अंदाजे समुद्रसपाटीपासून उंची ४२९० फूट आहे. मुल्हेरला जोडूनच मोरागड असून तो मुल्हेर किल्ल्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखतात. साल्हेर वाडी कडून जवळपास 22 किमी अंतर असून ताहाराबाद पासून 15 किमी अंतर आहे. इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा पेशवा मोरोपंत ह्यानी हा किल्ला सन १६७२ साली जिंकुन घेतला. मुघलांसाठी हा मोठा धक्का होता. सन १८१८ च्या शेवटच्या इंग्रज मराठा युद्धानंतर ह्या किल्ल्यावर चार मोठ्या तोफा असल्याचे काही उल्लेख सापडतात. फत्तेलश्कर, रामप्रसाद, शिवप्रसाद व मार्कंडेय अशी त्यांची नावे होती. त्यातील शेवटची तोफ इंग्रजांनी वितळवल्याचे कळते, तीन तोफांपैकी २ तोफा रामप्रसाद व शिवप्रसाद हे २०२१-२०२२ मध्ये जंगलात शोधमोहिमेत सापडल्या होत्या दिनांक ६ मार्च २०२२ रोजी पुरातत्त्व खाते नाशिक विभागाची परवानगी घेऊन सदर तोफा सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत १२ तासात मुल्हेर गडावर पोहच केल्या शेवटच्या युद्धानंतर महाराष्ट्रातील इतर बऱ्याच किल्ल्यांप्रमाणे हा किल्लाही बेवारस अवस्थेतच आहे. त्याच्या शेजारचे दोन किल्ले मोरा व हरगडही त्याच स्थितीत आहेत. वर जायच्या वाटा बंद झाल्यामुळे हरगडावर जाणेही अवघड झाले आहे.ह्या गडावर निसर्गरम्य वातावरणाचा लाभ मिळतो. मोरागड वर विस्तीर्ण पठार असून त्याला हवी तर माची म्हणू शकता. तसेच मोरागड वर पाण्याच्या टाक्या देखील आहेत नाशिक जिल्ह्यातील बागलाण परिसरात मोरा किल्ला आहे . बागलाण परिसरात दोन मुख्य डोंगररांगा आहेत, सेलबारी रांग डोलबारी पर्वतरांगाच्या दक्षिणेस आहे. या दोन्ही रांगा पूर्व-पश्चिम दिशेने एकमेकांना समांतर आहेत. मोरागड सेलबारी पर्वतरांगावर स्थित आहे. हे सर्व किल्ले बुरहानपूर- सुरत प्राचीन व्यावसायिक रस्त्यावर लक्ष ठेवण्यासाठी ठेवण्यात आले होते. हा रस्ता दोन्ही डोंगररांगांमधून जातो. मोरा किल्ला हा मुल्हेर किल्ल्याच्या पूर्वेस एक छोटासा किल्ला आहे