Перейти к содержимому

रात्र काळी (गवळण) - संत नामदेव - Ratra Kali (Gavalan) Sant Namdev

Anand Tarang

0:00 / 0:00

रात्र काळी (गवळण) - संत नामदेव - Ratra Kali (Gavalan) Sant Namdev

7 720 просмотров · 3 недели назад
Anand Tarang
735 подписчиков
7 720 просмотров · 3 недели назад
रात्र काळी, घागर काळी । (गवळण) - संत नामदेव संत नामदेवांच्या समाधी दिनानिमित्त आदरांजली वाहून सादर करतो आहोत संत नामदेव लिखित अवीट गोडीची एक गवळण - रात्र काळी, घागर काळी याला अन्यही काही चाली आहेत. पण अलका गोगटेंनी लावलेली ही मांड रागातली चालही तुम्हाला नक्कीच आवडेल. डॉ. मुग्धा बापट यांनी ती गायलीय सुद्धा खूप छान. ऐकाच तर... रचना : संत नामदेव संगीत आणि संवादिनी : अलका गोगटे गायिका : डॉ. मुग्धा बापट तबला : भावना टिकले टाळ : मंजिरी कर्वे राग : मांड ताल : भजनी धुमाळी #krishnadevotionalsongs #devotionalmusic #gavlan #santnamdev आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि अधिक भक्तिसंगीत ऐका :    / @anandtarangmandal   आनंद तरंग मंडळ कार्यक्रमासाठी संपर्क : anandtarangmandal@gmail.com "आनंद-तरंग"मंडळ (पुणे) मंजिरी कर्वे 9922450632 भावना टिकले 9372471755 "आनंद-तरंग"मंडळ हे कार्यक्रम करते - १) "आनंद-तरंग" - अभंग-गौळणींचा कार्यक्रम २) "धन्य ती आळंदी" - (संत ज्ञानेश्वरांचे चरित्र गीतबद्ध) ३) " हरिपाठ" ४) "काकड आरती" ५) "गीता-तरंग" (गीतेचे सार १८ अध्यायांच्या सोप्या मराठी १८ गीतांतून) ६) "रामकृष्णायन" (रामकृष्ण परमहंसांचे गीतचरित्र) ७) "स्वतंत्रते भगवती" (योगी अरविंदांच्या “भवानी भारती” या संस्कृत काव्यावर आधारित मराठी गीते) ८) देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम रात्र काळी, घागर काळी । यमुनाजळही काळे वो माय ॥धृ.॥ बुंथ काळी, बिलवर काळी । गळा मोती एकावळी काळी वो माय ॥ मीही काळी, काचोळी काळी । कासे कसिली ते काळी वो माय ॥१॥ एकली पाणिया न जाय साजणी । सवे पाठवा मूर्ती काळी वो माय ॥ विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी । कृष्णमूर्ती बहु काळी वो माय ॥२॥ #anandtarang #alakagogate #devotionalsongs #mandRaagBhajan #mugdhabapat #BhajaniDhumaliRhythm #DevotionalKrishnaSongs #anandtarangmandal #gavalani #bhajan #indianclassicalmusic #marathidevotionalsongs #janmashtami #radhakrishna