गोदावरी आता मृत नदी? पाण्यात ऑक्सिजन शून्य; MPCB अहवालातून धक्कादायक वास्तव | BBC News Marathi
BBC News Marathi
0:00 / 0:00
गोदावरी आता मृत नदी? पाण्यात ऑक्सिजन शून्य; MPCB अहवालातून धक्कादायक वास्तव | BBC News Marathi
19 034 просмотра · 10 ч назад
BBC News Marathi
3,53 млн подписчиков
19 034 просмотра · 10 ч назад
नाशिकच्या गोदावरी नदीत प्राणवायूच शिल्लक नाही? महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) अहवालानुसार, तपोवन, दसक आणि टाकळी या तीन ठिकाणच्या पाण्यात विरघळलेल्या प्राणवायूचं प्रमाण शून्य नोंदवण्यात आलं आहे.
याच अहवालात गोदावरीच्या पाण्यातील BOD चं प्रमाणही निर्धारित मर्यादेपेक्षा 6 ते 28 पट अधिक असल्याचं समोर आलं आहे.
पर्यावरण कार्यकर्ते रोशन केदार यांनी या स्थितीला गोदावरीचा संभाव्य जैविक मृत्यू म्हटलं आहे. गोदावरी पुनरुज्जीवनासाठी न्यायालयीन लढा देणारे याचिकाकर्ते राजेश पंडित यांनीही या निष्कर्षांवर चिंता व्यक्त केली आहे.
दुसरीकडे, पालकमंत्री गिरीश महाजन आणि नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि प्रदूषण नियंत्रणासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली आहे.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरीच्या प्रदूषणाचा प्रश्न किती गंभीर आहे? प्रशासनाच्या उपाययोजनांमुळे नदी पुन्हा स्वच्छ आणि जिवंत होणार का?
#Godavari #Nashik #MPCB #KumbhMela #GodavariPollution #BBCMarathi
बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi