Перейти к содержимому

साताऱ्यात महायुतीत दोन जागांवरील तिढा अद्याप कायम, #Lokvruttanews #satara

Lokvrutta News

0:00 / 0:00

साताऱ्यात महायुतीत दोन जागांवरील तिढा अद्याप कायम, #Lokvruttanews #satara

2 233 просмотра · 1 г. назад
Lokvrutta News
48,8 тыс. подписчиков
2 233 просмотра · 1 г. назад
साताऱ्यात महायुतीत दोन जागांवरील तिढा अद्याप कायम कराड उत्तर व फलटण या मतदारसंघातील उमेदवारीचा घोळ संपेना युतीत भाजपच मोठा भाऊ आणखी एक जागा मिळणार, राष्ट्रवादी अन् शिंदेसेनेच्या वाट्याला दोन-दोन जागा विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतून सातारा जिल्ह्यातील सहा मतदारसंघाचा तिढा सुटला असला तरी दोन मतदारसंघाचा घोळ सुरूच आहे. तरीही भाजप आणखी एक मतदारसंघ पदरात पाडून मोठा भाऊ होण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या वाट्याला प्रत्येकी दोन मतदारसंघ येणार आहेत. विधानसभा जागा वाटपाचे महाविकास आघाडी तसेच महायुतीतील गुऱ्हाळ सुरूच आहे. चर्चेच्या फेऱ्या रंगत आहेत. पण जागांचा तिढा सुटत नाही. सातारा जिल्ह्यातील आठपैकी सहा मतदारसंघांचे उमेदवार निश्चित झालेले आहेत. भाजपने सातारा, माण आणि कऱ्हाड दक्षिणचा उमेदवार जाहीर केला आहे. तर शिंदेसेनेने पाटण आणि कोरेगावच्या शिलेदारांवर शिक्कामोर्तब केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही वाईचा उमेदवार दिला आहे. त्यामुळे आता कऱ्हाड उत्तर आणि फलटण मतदारसंघ मिळविण्यासाठी महायुतीत बोलणी सुरू आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत यावर तोडगा निघेल, असे सांगण्यात येत होते. पण बैठकांवर बैठका झाल्या तरी तिढा दृष्टिक्षेपात नाही. कऱ्हाड उत्तर मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब पाटील आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाला हा मतदारसंघ हवा आहे. याठिकाणी भाजपच्या एखाद्या नेत्याला प्रवेश देऊन जागा लढविण्याच्या प्रयत्नात राष्ट्रवादी आहे. पण भाजपही या मतदारसंघावरील दावा सोडायला तयार नाही. त्यामुळे रस्सीखेचीत वाटपाचे घोडे अडले आहे. मतदारसंघ फलटण मतदारसंघ राखीव आहे. याठिकाणी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे उमेवार देण्याच्या तयारीत आहेत. पण याठिकाण राष्ट्रवादीचा आमदार होता. येथील दीपक चव्हाण यांनी नुकताच शरद पवार गटात प्रवेश केला आहे. तरीही या मतदारसंघासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. तसेच भाजपलाही हा मतदारसंघ हवा आहे. त्यामुळे फलटण मतदारसंघाचा घोळ संपेना, अशी स्थिती आहे. #satara #marathinews #marathi #dailynews