राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन| निवडक भजन | भाग ३५ | BHAJAN SANGRAH | SHRI MOHAN GAIGOL COLLECTION
Rashtrasant Tukdoji Maharaj Vichar
0:00 / 0:00
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन| निवडक भजन | भाग ३५ | BHAJAN SANGRAH | SHRI MOHAN GAIGOL COLLECTION
67 408 просмотров · 5 л. назад
Rashtrasant Tukdoji Maharaj Vichar
16,4 тыс. подписчиков
67 408 просмотров · 5 л. назад
आमच्या चॅनल ला आपण दान देऊ शकता , या चॅनल वर ads बंद आहे 🙏🙏
GOOGLE PAY : 7038205363
You can contribute to our channel :
GOOGLE PAY : 7038205363
१७२.
ग्रामजयंतीचा मंत्र घ्या हो नवा ।
देशात समता नांदवा ।।धृ0।।
एकाच्या महालांत फुलताति बागा ।
दुसऱ्यास धड नाही राहण्यास जागा ।।
अन्नासाठी फिरतो नागवा ।।१।।
क्रांतीची ही लाट गावात आली ।
पत्यास न्यायास प्रेमास व्याली ।।
राखा हिच्या या वैभवा ।।२।।
तो दास तुकड्या विनवुनि सांगे ।
बैसू चला सर्व एकाचि रांगे ।।
निजधर्मतत्वा जागवा ।।३।।
१७३.
माझ्या श्यामला कोमला! ।
ऐसा का रे रागावला? ॥ धृ ॥
काय आम्ही तुझे केले ?।
सांग कोणा दुःखविले ? ॥ १ ॥
तुझ्या भक्तांचाहि छळ ।
कोठे झाला का सढळ ? ॥ २ ॥
तुकड्या म्हणे का न येशी ।
आजी कृष्णा ! तू ध्यानासी ॥ ३ ॥
१७४.
का मज नेता त्या मार्गाने ?
अधम जिथे राहती ।। मित्र हो ! ।।धृ0।।
कधी न कुणाचे बरे चिंतती ।
अवघी टिंगल आणि फजिती ।।
सज्जन जेथे उभे राहता, ग्रासाया पाहती।।१।।
रात्रंदिनी ज्या निशाच दिसते।
मांस - मदीरा जवळी असते ।।
वेश्येचा बाजार भोवती, दिसती गुंड अती ! ।।२।।
असाल जरि तुम्ही मित्र आमुचे ।
वळवु नका क्षण पाय कुणाचे ।।
जेथे माणुसकी मुळी नाही,चालतसे गमती ! ।।३।।
अमोल जन्मा येउनि काही -
सार्थक जरी केले मुळि नाही ।।
तुकड्यादास म्हणे यंम येईल,चालुनिया वरती ! ।।४।।
१७५.
सुधरले देह - देवलको, उसीका मैल धो करके ।
बडा कचरा पडा भाई! निकालो आज भरभरके ।।टेक।।
नहीं झाड़ू लगा अंदर, उपरसे हे साफ मंदर ।
उसीमें घुस रहे बंदर, न होता रंग देकरके ।।१।।
उपरके रंगको हरले, सभी कचरा सफा करले।
प्रभूमें भावना धरले, चला जा फेर भव तरके ।।२।।
चला भटका कहाँ भाई? सभी देवल भरा साँई ।
जमींको मैलने खाई, ले झाड़ू नाम निज धरके ।।३।।
कहे तुकड्या तूहि देवल, उसीमें राम है केवल l
गुरुको पुछले सेवल, वही दे एकता करके ।।४।।