Перейти к содержимому

गोपाळ आबांच्या घरचा गणपती | ४०० वर्षे जुने ऐतिहासिक घर 🌺

ChinkiChinuVlogs

0:00 / 0:00

गोपाळ आबांच्या घरचा गणपती | ४०० वर्षे जुने ऐतिहासिक घर 🌺

1 082 просмотра · 2 нед. назад
ChinkiChinuVlogs
416 подписчиков
1 082 просмотра · 2 нед. назад
नमस्कार मंडळी! 🙏 स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये! आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत कोकणातील परंपरा आणि वारसा जपणाऱ्या वाड्यांपैकी एक म्हणजे गोबळ आबांचे घर! जवळपास ३५० ते ४०० वर्षे जुना असलेला हा वाडा म्हणजे तत्कालीन स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना आहे. पंचधातू मिश्रित माती, चुना आणि सागवानी लाकूड यांचा वापर करून बांधलेली ही भक्कम वास्तू अनेक शतके उलटून गेली तरी आजही आपले अस्तित्व टिकवून आहे. या घराचा संपूर्ण परिसर जवळपास ४०,००० चौरस मीटर इतका विस्तीर्ण आहे. घरामध्ये ५० पेक्षा जास्त दरवाजे असून, त्यांना लाकडी आणि लोखंडी अडण्या आहेत. या वास्तूचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे शस्त्रांची पूजा केली जाते. ही शस्त्रे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील असल्याचे सांगितले जाते. आजही या घरात २० ते २१ बिर्‍हाडे एकत्र राहतात आणि सर्व सण-उत्सव एकोप्याने साजरे करतात. काळ बदलला, पिढ्या बदलल्या, तरी या घरातील परंपरा आणि एकजूट आजही कायम आहे. हा ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत जतन करून ठेवण्यासाठी या घराचे चिरेबंदी पद्धतीने नूतनीकरण करण्यात आले आहे. मात्र, घरातील जुन्या ऐतिहासिक आणि पारंपरिक वस्तूंचे मूळ स्वरूप न बदलता त्यांची जपणूक करण्यात आली आहे. इतिहासाचा वारसा, स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आणि पिढ्यान्‌पिढ्या जपलेली एकजूट यांचा सुंदर संगम म्हणजे गोबळ आबांचे हे ऐतिहासिक घर! व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि हा ऐतिहासिक वाडा तुम्हाला कसा वाटला, हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास Like 👍 आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत Share ↗️ करायला विसरू नका! आणि हो, अशाच छान छान व्लॉग्ससाठी आपल्या ChinkiChinuVlogs चॅनेलला Subscribe नक्की करा! ❤️ 🔔 Subscribe for more videos! YoutTube Channel :    / @chinkichinuvlogs   Instagram Id: https://www.instagram.com/chinkichinu... Music by Mikhail Smusev from Pixabay #ChinkiChinuVlogs #kankavli #konkanganpati #400years #heritage #marathivlog #konkantourism #festival #konkanvlog #couplegoal