महाराष्ट्राचं सर्वात प्राचीन मंदिर: भुलेश्वर मंदिर l Bhuleshwar Mandir Pune
Ek Anubhav Bhatkanticha एक अनुभव भटकंतीचा
0:00 / 0:00
महाराष्ट्राचं सर्वात प्राचीन मंदिर: भुलेश्वर मंदिर l Bhuleshwar Mandir Pune
1 212 просмотров · 3 года назад
Ek Anubhav Bhatkanticha एक अनुभव भटकंतीचा
2,94 тыс. подписчиков
1 212 просмотров · 3 года назад
भुलेश्वर शिव मंदिर
भुलेश्वर मंदिर हे शिल्पाकृतीचा एक अद्वितीय अनुभव देणारे तर आहेच पण तिथल्या निसर्गसौन्दर्याचा पण आनंद देते. ह्या मंदिराला ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्व आहे . पुण्यात आणि आसपास भटकंतीची बरीच ठिकाणे प्रसिद्ध आहेत. अशाच ठिकाणांपैकी थोडेसे अपरिचित असलेले ठिकाण म्हणजे भुलेश्वर. हे मंदिर आहे शंभू महादेवाचे. मंदिराच्या पायथ्यापर्यंत गाड्या नेता येतात. तुम्ही जसे जसे मंदिराच्या जवळ जायला लागतात तस तसे तुम्हाला एखाद्या किल्ल्याला भेट दिल्यासारखे वाटते आणि ते अगदी बरोबर आहे कारण हे मंदिर ज्या डोंगरावर बांधले आहे त्याच डोंगरावर दौलतमंगळ किल्ला बांधला होता. हा किल्ला १६३४ मध्ये विजापूरचा सरदार मुरार जगदेव ह्याने ह्या डोंगरावर बांधला. साधारण २०० एक पायऱ्या चढून गेल्या नंतर तुम्ही मंदिराच्या आवारात पोहचता. पायऱ्या चढतानाच आपल्याला उत्कृष्ठ कोरीव शिल्पे आणि ह्या मंदिरचे वैभव दिसू लागते.
पुराणकालात देवी पार्वतीने इथे भगवान शंकरासाठी नृत्य केले आणि त्याची महादेवांना भुरळ पडली. त्यानंतर त्यांचा विवाह झाला, अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. महादेवाला पार्वतीच्या सौंदर्याने भूल पाडली, म्हणून हे ठिकाण भुलेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले.तेराव्या शतकात देवगिरीकर यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक हेमाडपंती मंदिरे निर्माण करण्यात आली. याच शतकाच्या मध्यास भुलेश्वर मंदिराचे बांधकाम झाले असावे. इतर हेमाडपंती मंदिरांच्या तुलनेत या मंदिरातील शिल्परचना उच्च प्रतीची आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरांच्या बाहेरील प्राकाराची रचना उत्तरेतील जैन मंदिरांच्या धर्तीवर आहे. येथील शिवमंदिरास भुलेश्वर-महादेव किंवा यवतेश्वर म्हणतात. मंदिराची मूळ बांधणी १३ व्या शतकातील असून सभोवतालची भिंत, नगारखाना व शिखरे १८ व्या शतकातील मराठा शैलीतील आहेत. पूर्वी मूळ मंदिरास भव्य प्राकार होता व नंदीचा मंडप स्वतंत्र होता. १८ व्या शतकात झालेल्या जीर्णोद्धारानंतर हे मंदिर एकाच छताखाली आले.
भूलेश्वर मंदिरातील शिल्पे, शिल्पसौंदर्याचा उत्तम आविष्कार आहेत. पुरातत्वखात्याने हे मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे . महाशिवरात्री ला इकडे खूप गर्दी असते तसेच श्रावण महिन्यात इथे हिंदोळा उत्सव साजरा केला जातो. तुम्ही इकडे कधीही येऊ शकतात. मे आणि सप्टेंबरमध्ये पक्षी जवळच्या नारायणबेट टेकडीवर स्थलांतर करतात. जर तुम्हाला पक्षी निरीक्षण आवडत असेल तर नक्की च तुम्ही ह्या महिन्यांमध्ये भेट देऊ शकतात.
Location:
https://www.google.com/maps/dir/Pune,...
#ytshorts Bhuleshwar_Mandir #mahadev #mandir #ancienttemplesofindia #saswad #EkAnubhavBhatkanticha #punyacheverul
Hope you guys like this Video!
#Bhuleshwar #Bhuleshwar_Mandir #mahadev #mandir #ancienttemplesofindia #saswad #EkAnubhavBhatkanticha #punyacheverul #dronevideo #drone