Ashadi Vari 2026 | वैदिक विचारधारेच्या भिडे - भंडारेसारख्यांची वारकरी संप्रदायातील घुसखोरी चिंताजनक
Lay Bhari News
0:00 / 0:00
Ashadi Vari 2026 | वैदिक विचारधारेच्या भिडे - भंडारेसारख्यांची वारकरी संप्रदायातील घुसखोरी चिंताजनक
168 693 просмотра · 1 месяц назад
Lay Bhari News
127 тыс. подписчиков
168 693 просмотра · 1 месяц назад
#AshadiVari2026 #SamataSanvidhanDindi #SangramBhandare #sambhajibhide #SantTukaramPalakhi2026 #santdnyaneshwar
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सारथ्य संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा केले. हेच संभाजी भिडे म्हणाले होते की, म्हणून हा संत तुकाराम महाराजांपेक्षा श्रेष्ठ आहे. संभाजी भिडे आणि वारकरी संप्रदायाचा काही एक संबंध नाही. संभाजी भिडे यांबद्दल संत तुकाराम महाराजांच्या विश्वस्तांनी भूमिका जाहीर केली पाहिजे, असे आव्हान विकास लवांडे यांनी केले आहे. लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी विकास लवांडे यांची मुलाखत घेतली. संविधान समता दिंडीला शुक्रवारी प्रारंभ झाला. पुण्यातील महात्मा फुले यांच्या वाड्यातून या त्यांचे प्रस्थान केले. यावेळी ही मुलाखत घेण्यात आली. यावेळी विकास लवांडे म्हणाले की, वैदिक परंपरा आणि वारकरी संप्रदाय दोन्ही भिन्न आहेत. वैदिक म्हणजेच ब्राह्मण यांच्यावर संतांनी वारंवार केलेले आहेत. वारकरी संप्रदायाला सर्व धर्माची परंपरा लाभलेली आहे. परंतु वारकरी संप्रदायात आर एस एस, भाजपचे लोक घुसले आहेत. जवळपास 200 कीर्तनकार आरएसएस विचारधारेचे असून ते वारकरी संप्रदायाच्या विरोधी विचार वारकरी चळवळीत येऊन मांडतात. वारकरी संप्रदायासमोरील फार मोठा चिंतेचा विषय आहे, असे विकास गावंडे म्हणाले.