Pune इंदापूरचा विश्वजीत तीन वर्ष विना चप्पल चा राहिला, कारण सांगताना कृषिमंत्र्यांसमोर ढसाढसा रडला
IMIRROR.DIGITAL
0:00 / 0:00
Pune इंदापूरचा विश्वजीत तीन वर्ष विना चप्पल चा राहिला, कारण सांगताना कृषिमंत्र्यांसमोर ढसाढसा रडला
5 444 просмотра · 1 день назад
IMIRROR.DIGITAL
22,2 тыс. подписчиков
5 444 просмотра · 1 день назад
#pune #punenews #punekar #indapur #ncp #ncpnews #breakingnews #breaking #maharashtra #maharashtranews #maharashtrapolitics #baramati #sunetrapawar
पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील पडस्थळ येथील विश्वजीत मारकड या तरुणाने गेल्या तीन वर्षापासून पायात चप्पल घातली नव्हती, इंदापूरचे लोकप्रतिनिधी म्हणून दत्तात्रय भरणे तिसऱ्यांदा आमदार व्हावेत आणि शेतकरी पुत्र म्हणून त्यांची कृषिमंत्री म्हणून मंत्रिमंडळात वर्णी लागावी असा त्याचा नवस होता.
अखेर त्याचा नवस पूर्ण झाल्यानंतर आज इंदापूरच्या भरणेवाडी येथील निवासस्थानी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विश्वजीत मारकड याचा सत्कार करून त्याला कोल्हापुरी चप्पल भेट दिली आहे. यावेळी विश्वजीत मारकड याला अश्रू अनावर झाले.