डाळ तडका अधिक चविष्ट कसा करायचा | सोप्या ट्रीक आणि टीप्स |भारी चवीचा डाल तडका |daltadka | dalfry
Sugran Seema
0:00 / 0:00
डाळ तडका अधिक चविष्ट कसा करायचा | सोप्या ट्रीक आणि टीप्स |भारी चवीचा डाल तडका |daltadka | dalfry
3 210 просмотров · 2 мес. назад
Sugran Seema
24,3 тыс. подписчиков
3 210 просмотров · 2 мес. назад
साहित्य
पाऊण वाटी. तूर डाळ
पाव वाटी. मुग डाळ
१/४. हींग
१/२. हळद
१/२ वाटी. तूप
१ कांदा. बारीक चिरलेला
टोमॅटो. बारीक चिरलेलं
आलं लसूण पेस्ट. १ चमचा
१ चमचा. लाल तिखट
१/२ चमचा. गरम मसाला
१/२ चमचा. धणा पावडर
१ चमचा. जिरं मोहरी
२,३ लसूण. ठेचलेला
१,२. सुक्या लाल मिरच्या
४,५. कडीपत्ता
१/२ वाटी. कोथिंबीर
१/२ लिंबू. रस
कृती
प्रथम तूर डाळ आणि मुगडाळ स्वच्छ धुवून त्यात हळद, हींग, आणि तुप घालून कुकरमध्ये शिजवून घ्या.आणि गरम असतानाच थोडी मोडून घ्या.मधयम आचेवर कढई तापत ठेवून त्यात दोन चमचे तूप आणि १/२ चमचा तेल घालून चांगले गरम झाले की त्यात आलं लसूण भरड,कांदा, टोमॅटो, लाल तिखट,धणा पावडर,गरम मसाला, तेलावर खमंग परतून घ्या.मीठ घाला. टोमॅटो मऊ झाल्यावर त्यात मोडलेली डाळ घालून चांगले परतून घ्या. डाळीला छान उकळी आली की त्यात राई जिरं धणे कडीपत्ता ठेचलेला लसूण,सुकी मिरची यांची फोडणी द्या. नंतर त्यात लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून गॅस बंद करा आणि गरमागरम डाल तडका सर्व्ह करा.
#डाळ #डालतडका #डालफ्राय #तडका #सुगरणसीमा #सुगरण सीमा #मराठी रेसिपी #वरण #डाळभात #वरणभात #daltadka #dalfry #sugran #sugranseema #indianfood