Перейти к содержимому

डागा हॉस्पिटलमधून अपहरण झालेल्या 1 दिवसाच्या बाळाची सुखरूप सुटका! महिला ताब्यात #citynews_amravati

City News Channel

0:00 / 0:00

डागा हॉस्पिटलमधून अपहरण झालेल्या 1 दिवसाच्या बाळाची सुखरूप सुटका! महिला ताब्यात #citynews_amravati

16 080 просмотров · 2 недели назад
City News Channel
390 тыс. подписчиков
16 080 просмотров · 2 недели назад
नागपूर शहर पोलिसांनी मोठी आणि तत्पर कारवाई करत डागा हॉस्पिटलमधून अपहरण झालेल्या एका दिवसाच्या चिमुकलीची सुखरूप सुटका केली आहे. या प्रकरणातील संबंधित महिलेलाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. डीसीपी राहुल मदने यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी डागा हॉस्पिटलमधून एक दिवसाच्या मुलीचे अपहरण झाल्यानंतर तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नॉर्थ रिजनचा डीबी स्टाफ आणि बीट मार्शल तपासासाठी सक्रिय करण्यात आले. तपासादरम्यान यशोधरा नगर पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. वरिष्ठ पीआय शेख आणि त्यांच्या टीमने तातडीने कारवाई करत संबंधित महिलेच्या ताब्यातून बाळाची सुटका केली. या तपासात नागरिकांकडून मिळालेल्या माहितीचाही पोलिसांना मोठा फायदा झाला. संबंधित महिला सध्या पोलिसांच्या ताब्यात असून अपहरणामागचे नेमके कारण काय, तिला कोणी सहकार्य केले का आणि हा प्रकार कशासाठी करण्यात आला, याचा पुढील तपास सुरू आहे. नागपूर पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे एका दिवसाच्या चिमुकलीची सुखरूप सुटका करण्यात यश आले आहे. #NagpurNews #DagaHospital #NagpurPolice #ChildRescue #RahulMadne