माय माझी माय माझी माय स्वामी राज माझी माय | May mazi may mazi may swami raj mazi may
स्वरदर्पण
0:00 / 0:00
माय माझी माय माझी माय स्वामी राज माझी माय | May mazi may mazi may swami raj mazi may
38 439 просмотров · 3 года назад
स्वरदर्पण
28,2 тыс. подписчиков
38 439 просмотров · 3 года назад
गाण्याचे बोल:-
माय माझी माय माझी माय
स्वामीराज माझी माय
स्वामी समर्थ माय माझी स्वामी समर्थ माय
सद्गुरु आहे पाठिराखा वंदू त्याचे पाय वंदू त्याचे पाय पाय
माय माझी माय माझी माय
स्वामीराज माझी माय
लेकरास या तोच चालवी बोट धरूनी हाती
परमार्थाचा दीप दाखवी अंधाराच्या राती
भक्त वासरू चुकले त्याला सांभाळी ही गाय सांभाळी ही गाय ||१||
व्यवहारी या जगी कळेना पुण्य कोणते पाप
भक्तीमधूनी शक्ती मिळते सरे मनाचा ताप
गुरू माउली रक्षण करते जशी दुधावर साय
जशी दुधावर साय साय ||२||
शरण गुरूच्या चरणी जावे नाम जपावे ओठी
स्वामी समर्थ स्वामी समर्थ
स्वामी समर्थ स्वामी समर्थ
शरण गुरूच्या चरणी जावे नाम जपावे ओठी
गुरूमुखाने मंत्र मिळावा जीवन मुक्ती साठी
गुरू पिता गुरू माता बंधू गुरूविण दुसरे काय
गुरूविण दुसरे काय ||३||
माय माझी माय माझी माय स्वामीराज माझी माय
स्वामी समर्थ माय माझी स्वामी समर्थ माय
सद्गुरु आहे पाठिराखा वंदू त्याचे पाय वंदू त्याचे पाय
माय माझी माय माझी माय स्वामीराज माझी माय