पूर्णेकर कुटुंबाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर; मीनाक्षी शिंदेंची पोलीस संरक्षण वाढवण्याची मागणी
Public_Awareness
0:00 / 0:00
पूर्णेकर कुटुंबाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर; मीनाक्षी शिंदेंची पोलीस संरक्षण वाढवण्याची मागणी
6 141 просмотр · 1 дн. назад
Public_Awareness
3,77 тыс. подписчиков
6 141 просмотр · 1 дн. назад
#PradeepPurnekar #RamPurnekar #MeenakshiShinde #ThaneNews #ThanePolitics #ThanePolice #PoliceProtection #AshutoshDumbre #प्रदीपपूर्णेकर #रामपूर्णेकर #मीनाक्षीशिंदे #ठाणे #ठाणेबातम्या #ठाणेपोलिस #महाराष्ट्रबातम्या
ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्याकांडानंतर आता त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राम पूर्णेकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या पोलीस संरक्षणात वाढ करण्यात यावी, अशी मागणी माजी महापौर तथा नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना निवेदन सादर केले. विशेष म्हणजे, पूर्णेकर कुटुंबाला मदत करणारे दिनेश पवार, अखिलेश पाल, प्रशांत मोटे, आनंद भोईर, किसान तट्टे आणि विवेक पांढरे यांच्याही सुरक्षेत वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या संवेदनशील प्रकरणाचा काही राजकीय नेते राजकीय स्वार्थासाठी वापर करत असल्याचा आरोपही मीनाक्षी शिंदे यांनी केला. पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत पोलीस प्रशासनाने तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी केली. आता पोलीस प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.