🌸 तुझ्या जीवनाचा फुलेल संसार | कणाकणात नांदे ईश्वर | सुंदर निरंकारी मराठी भक्तिगीत |
निरंकारी स्वरधारा
0:00 / 0:00
🌸 तुझ्या जीवनाचा फुलेल संसार | कणाकणात नांदे ईश्वर | सुंदर निरंकारी मराठी भक्तिगीत |
153 просмотра · 10 ч назад
निरंकारी स्वरधारा
136 подписчиков
153 просмотра · 10 ч назад
🎶 गीताचे नाव: तुझ्या जीवनाचा फुलेल संसार
✍️ गीतकार: संदीप भोये
🎼 प्रकार: मराठी निरंकारी भक्तिगीत
🎵 गायन: Male-Female Duet & Chorus
🙏 हे भक्तिगीत आवडल्यास व्हिडिओला Like करा, आपल्या मित्र-नातेवाईकांना Share करा आणि आपल्या प्रतिक्रिया Comment मध्ये नक्की कळवा.
🔔 अशाच सुंदर निरंकारी भक्तिगीतांसाठी आपल्या निरंकारी स्वरधारा YouTube Channel ला Subscribe करा.
(ध्रुवपद)
कणाकणात नांदे ईश्वर
गुरुकडुनी घे दिव्य नजर हो
ज्ञानचक्षूंनी पाही ईश्वर,
तुझ्या जीवनाचा फुलेल संसार,
तुझ्या जीवनाचा होईल उद्धार,
(कडवे २)
मिळे आनंद या जीवनात
सर्व सुखांची होई बरसात हो
गुरुवचनी तू राही र,
तुझ्या जीवनाचा फुलेल संसार,
तुझ्या जीवनाचा होईल उद्धार,
(कडवे ३)
अहंकाराला ठेवू सदा दूर
नम्रतेचा असू दे वावर हो
गुरुचरणी झुकव तू शीर,
तुझ्या जीवनाचा फुलेल संसार,
तुझ्या जीवनाचा होईल उद्धार,
(कडवे ४)
सेवा-स्मरण करू निरंतर
प्रेमभावाचा वाहू दे निर्झर हो
गुरुअंगणी नाचू दे मनमोर
तुझ्या जीवनाचा फुलेल संसार,
तुझ्या जीवनाचा होईल उद्धार,
(कडवे ५)
गुरुभक्तीचा चढू दे रंग
तूही तूही च्या रंगी हो दंग हो
गुरूभजनी संदीप हो चूर,
तुझ्या जीवनाचा फुलेल संसार,
तुझ्या जीवनाचा होईल उद्धार,
#निरंकारीस्वरधारा #तुझ्याजीवनाचाफुलेलसंसार #निरंकारीभक्तिगीत #मराठीभक्तिगीत #सद्गुरू #ब्रह्मज्ञान #सेवास्मरण #गुरुभक्ती #धननिरंकारजी