Перейти к содержимому

घे पारखून रं दादा, घे निरखून | आला मानव या देहाला | निरंकारी मराठी भक्तिगीत

निरंकारी स्वरधारा

0:00 / 0:00

घे पारखून रं दादा, घे निरखून | आला मानव या देहाला | निरंकारी मराठी भक्तिगीत

6 378 просмотров · 2 нед. назад
निरंकारी स्वरधारा
133 подписчика
6 378 просмотров · 2 нед. назад
घे पारखून रं दादा घे निरखून, निर्गुणाची खूण ही आता सद्गुरूकडून। आला मानव या देहाला, फेरा चौऱ्याऐशीचा फिरून ॥ ध्रु ॥ निर्गुण हा देव जळी स्थळी भरलेला, रानावनात हा पानाफुलात दडलेला। घे पडताळून, ग्रंथ पुरातन, गाती महिमा याचेच गुण ॥१॥ आला मानव या देहाला..... जपातपाने हा ना कुणाला कळेना, सद्गुरु वाचुनी हृदय कमळ फुलेना। घे सत्य हे जाणून,समजून उमजून, प्रेम नगरीला जाऊन ॥२॥ आला मानव या देहाला.... फेरा नको पुन्हा पुन्हा, जन्ममरणाचा, करी उद्धार अपुल्या, या नरजन्माचा। घे पाहूनी देव, सद्गुरु दावी ठाव, नको जाऊ तू मायेला भुलून ॥३॥ आला मानव या देहाला.... निर्गुणाची पटता खूण, येई आनंदा उधाण सर्वाठायी हा घनश्याम, कर याचे दर्शन। “संदीप” सद्गुरुला, येऊनी शरण, घे भक्तिरसात न्हाऊन ॥४॥ आला मानव या देहाला.....