Перейти к содержимому

भाजपचे दोन अर्ज बाद होताच समीकरण बदलले : उल्हासनगरात शिवसेनेचे ५ तर भाजपचे २ स्वीकृत नगरसेवक

Prawaas Marathi

0:00 / 0:00

भाजपचे दोन अर्ज बाद होताच समीकरण बदलले : उल्हासनगरात शिवसेनेचे ५ तर भाजपचे २ स्वीकृत नगरसेवक

193 просмотра · 9 дней назад
Prawaas Marathi
154 подписчика
193 просмотра · 9 дней назад
: उल्हासनगर महानगरपालिकेतील सात स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीला अखेर गुरुवारी, १ ऑक्टोबर रोजी मुहूर्त मिळाला. मात्र, निवडणूक प्रक्रिया सुरू होताच नाट्यमय घडामोडींना सुरुवात झाली. भाजपचे दोन उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाल्याने निर्माण झालेल्या पेचात अखेर शिवसेनेचे पाच तर भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले. या प्रक्रियेवर भाजपने आक्षेप घेतला असून, पक्षाचे गटनेते राजेश वधारिया यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी २२ सप्टेंबर रोजी एकूण ४२ इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. पक्षीय संख्याबळाच्या आधारे भाजपच्या वाट्याला चार, तर शिंदेसेनेच्या वाट्याला तीन जागा येत असल्याचे यापूर्वी स्पष्ट झाले होते. त्यामुळे भाजपचे चारही उमेदवार निवडून येतील, अशी राजकीय चर्चा होती. मात्र, गुरुवारी झालेल्या छाननीत भाजपचे कपिल अडसूळ आणि प्रदीप रामचंदानी यांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे बाद झाले. भाजपकडे पर्यायी अर्ज उपलब्ध नसल्याने पक्षासमोर मोठा पेच निर्माण झाला. भाजपकडून धनंजय बोडारे, राजेंद्र श्रीखंडे, कपिल अडसूळ आणि प्रदीप रामचंदानी या नावांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. या पेचातून मार्ग काढण्यासाठी भाजपकडून महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्याकडे ऐनवेळी दोन नगरसेवकांच्या नावांची नवीन शिफारस करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवीन नावे स्वीकारण्यास शिवसेनेचे सभागृह नेते अरुण आशान आणि नाना बागुल यांनी आक्षेप घेतला. छाननी पूर्ण झाल्यानंतर अशा प्रकारे नवीन नावे स्वीकारणे कायद्याने योग्य आहे का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी या प्रक्रियेवर आक्षेप नोंदवला. आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करताना, शिफारस स्वीकारून पुढे पाठवली असली तरी ती स्वीकारायची किंवा फेटाळायची, हा अधिकार सभागृहाचा असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर महापौर अश्विनी निकम यांनी स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवर अंतिम शिक्कामोर्तब केले. महापालिकेतील नामनिर्देशित सदस्यांच्या निवडीसंदर्भात यापूर्वीही न्यायालयीन वाद निर्माण झाला होता. मुंबई उच्च न्यायालयाने सप्टेंबरमध्ये महापौरांनी निवड प्रक्रिया अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या चुकीचा ठरवत प्रक्रिया पुढे नेण्याचे निर्देश दिले होते. सध्या पालिकेत भाजपचे ३६ तर शिवसेनेचे ३७ नगरसेवक असे संख्याबळ आहे. महापौर अश्विनी निकम यांच्याबाबत सभागृहात अपशब्द वापरल्याप्रकरणी भाजप नगरसेवक प्रधान पाटील यांना तीन सर्वसाधारण सभांसाठी निलंबित करण्यात आले होते. निलंबनाची कारवाई झालेली असतानाही पाटील निवडणुकीसाठी सभागृहात उपस्थित राहिल्याने त्यांना सुरक्षारक्षकांमार्फत सभागृहाबाहेर काढण्यात आले