Перейти к содержимому

सणासुदीच्या दिवसांमध्ये कमीत कमी वेळामध्ये बनवा तोंडात ठेवल्याबरोबर विरघळणारे ओल्या नारळाचे लड्डू

Hema cooking creation

0:00 / 0:00

सणासुदीच्या दिवसांमध्ये कमीत कमी वेळामध्ये बनवा तोंडात ठेवल्याबरोबर विरघळणारे ओल्या नारळाचे लड्डू

189 просмотров · 12 дней назад
Hema cooking creation
764 подписчика
189 просмотров · 12 дней назад
सणासुदीच्या दिवसांमध्ये कमीत कमी वेळामध्ये बनवा तोंडात ठेवल्याबरोबर विरघळणारे ओल्या नारळाचे लड्डू #recipe #viral #food #Hemacooking creation साहित्य ओले नारळ/नारळाच्या वरची साल काढावी तूप चार चमचे साखर 150 gm नारळाचा कीस 400 gm दूध 400 ml बदाम, काजू, पिस्ता, टरबुजाच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, मनुका, इलायची कृती व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दोन नारळ घेतले मिडीयम साईजचे नारळाला फोडून झाडावरचे काळे साल काढून घेतले त्यानंतर मिडीयम साईज चे तुकडे केले छोटे छोटे स्वच्छ धुऊन घेतले पाण्याने त्यानंतर एक मिक्सरच भांड घेतलं त्यामध्ये छोटे छोटे तुकडे दोन भागांमध्ये टाकले मिक्सरच भांड बंद करून फॉल्स मोडवर दोन तीनदा फिरवून त्याचा किस बनवला म्हणजेच खोबऱ्याचा कीस बनवला पांढराशुभ्र असा कीस तयार होतो त्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी 400 ग्रॅम इतका खोबऱ्याचा कीस घेतला त्यानंतर 400 ग्रॅम ला दीडशे ग्रॅम इतकी साखर घेतली त्याचबरोबर कढईमध्ये दोन चम्मच तूप घातलं आणि खोबऱ्याचा कीस घातला आणि पाच ते सहा मिनिटे मिडीयम टू लो आचेवर खोबऱ्याचा कीस आला भाजून घेतलं त्यानंतर 400 ग्रॅम खोबऱ्याच्या किसाला 400 एम एल असं दूध घातलं दुधाला एक ते दोन उकळी येऊ दिल्या नंतर त्यामध्ये दीडशे ग्रॅम साखर घातली पुन्हा त्याला पाच मिनिट पाच मिनिट मिडीयम टू लो आचेवर परतून घेतलं जसे जसे दूध आटल्या जात होतं तसं तसं त्यामध्ये चम्मच घालून ढवळत होते त्यानंतर सर्व ड्रायफ्रूट्स कट करून कढईमध्ये थोडं तूप गरम करून मिडीयम टू लो आचेवर सर्व सर्व भाजून घेतले जेणेकरून त्यामधला कच्चेपणा निघून जाईल नंतर दूध साखर आणि टाकलेला खोबरा कीस याच्यामध्ये पूर्ण दूध आटल्या गेलेलं आता ते ड्रायफ्रूट मध्ये तयार झालं त्यानंतर गॅस बंद करून पाच मिनिटे त्याला थंड होऊ दिल भाजलेले सर्व ड्रायफ्रूट्स त्यामध्ये घातले त्यानंतर वेलची पूड घातली आणि मिक्स केलं मिक्स केल्यानंतर आता हे सर्व सारण आपल्याला लाडू बांधण्यासाठी तयार झालं होतं आणि एक एक करून सर्व लाडू मी तयार केले आणि एका डब्यामध्ये भरून घेतले हे लाडू कमीत कमी दहा दिवस तरी टिकतात जर गणपती मध्ये तुम्हाला करायचे असेल किंवा सणासुदीला तुम्हाला करायचे असेल तर नक्की करून बघा एकदम रसरशीत असे लाडू तयार होतात आणि जर तुम्ही हेमा कुकिंग क्रिएशन मध्ये नवीन असाल तर नक्कीच तेव्हा कुकिंग क्रिएशनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद