Перейти к содержимому

Sangamner | संगमनेर मध्ये हनुमान जयंतीची अनोखी परंपरा | संगमनेर रथ यात्रा | SP24 Taas

SP 24 TAAS

0:00 / 0:00

Sangamner | संगमनेर मध्ये हनुमान जयंतीची अनोखी परंपरा | संगमनेर रथ यात्रा | SP24 Taas

4 963 просмотра · 1 г. назад
SP 24 TAAS
376 тыс. подписчиков
4 963 просмотра · 1 г. назад
Sangamner | संगमनेर मध्ये हनुमान जयंतीची अनोखी परंपरा | संगमनेर रथ यात्रा | SP24 Taas Sangamaner Hanuman Jayanti Sangmaner Amol Khatal Balasaheb Thorat Sangamner Hanuma Rath Yatra Vikhe Vs Thorat Thorat Vs Khatal अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात ब्रह्मचारी असणाऱ्या हनुमंताचा रथ ओढण्याचा मान हनुमान जयंतीला महिलांना दिला जातो.. ब्रिटीशांनी घातलेल्या रथ यात्रेची बंदी झुगारून शेकडो महिलांनी 1929 साली रथ यात्रा काढली होती. तेव्हापासून ही परंपरा आजतागायत सुरु आहे. या रथ यात्रेदरम्यान पोलिसांना विशेष मान असून पोलिसांनी वाजत गाजत आणलेला झेंडा रथावर लावल्यावरच रथ ओढला जातो. संगमनेरच्या ह्या रथ यात्रेला तब्बल 96 वर्षाची पंरपरा आहे.. परंपरेनुसार "बलभीम हनुमान की जय" चा जयघोष करत महिलांनी रथ ओढत हनुमान जंयती रथ यात्रेला आज प्रारंभ केला. चंद्रशेखर चौक श्रीराम मंदिर येथून सुरु झालेली रथ यात्रा संपुर्ण गावातून मिरवणूक होवून पुन्हा श्रीराम मंदिरात येते.. ब्रम्हचारी हनुमंताचा रथ महिलांनी ओढणे याची देखिल एक अख्यायिका सांगीतली जाते..ब्रिटीशांनी या रथ यात्रेवर बंदी घालून अनेक तरुणांना ताब्यात घेतले होते. 23 एप्रिल 1929 रोजी हनुमान जयंतीच्या पहाटे मंदिराभोवती पोलिसांचा गराडा पडला. पोलीस आपल्या सरकारी ताकदीच्या जोरावर मिरवणुकीस करत असलेला विरोध पाहता नेते मंडळी घरी गेली. एवढ्यात अचानक 200 ते 250 महिलांनी एकत्र येत रथ ताब्यात घेतला. पोलिसांनी महिलांबरोबर अनेक युक्तिवाद केले, भीती दाखवली, अटक करण्याची- खटले भरण्याची धमकीही दिली. सरकारी ताकदीचा रुबाब दाखवला पण या आदिशक्तीस्वरुप भारतीय नारींनी आपला उत्सव पार पाडण्याचा निर्धार कायम ठेवला. तसेच झुंबरबाई अवसक, बंकाबाई परदेशी, लीला पिंगळे आणि इतर मुली, महिलांनी रथावर चढून हनुमान प्रतिमा ठेऊन कुणालाही काही कळण्याच्या आत रथाचा दोर ओढण्यास सुरुवात केली. गेल्या 96 वर्षापासून ही प्रथा परंपरा अखंडित पणे पार पाडली जाते.. अलिकडे यात फोटो सेशन आणि मान-अपमान याची चढा ओढ दिसून येते.. यंदा तर या रथ यात्रे शुल्लक कारणावरुन खटके देखिल उडालेत.. बजरंग बलीच्या रथाचा मान महिलांना असतो मात्र पुरुषांची यात ही लुडबूड पाहायला मिळत असल्यानं महिलांना मध्ये नाराजी सूर उमटू लागलाय.. तेव्हा देवा पुढे ताकद दाखवणा-यांनी महाबली हनुमानाच्या शक्तीचा देखिल अंदाज घ्यावा कारण तो साधासुधा नाही तर महाबली आहे याच भाव राखवं. #sp24taas #sanganer #amolkhatal #balasahebthorat #sangmernews #hanumanjayanti #ahilyanagarnews #ahilyanagarupdate #sujayvikhepatil