‘बाप तो बाप रहेगा’वरून राडा! श्वेता महाले अन् संजय गायकवाड आमनेसामने
Saral Soppa - सरळ सोप्पं
0:00 / 0:00
‘बाप तो बाप रहेगा’वरून राडा! श्वेता महाले अन् संजय गायकवाड आमनेसामने
1 764 просмотра · 7 дней назад
Saral Soppa - सरळ सोप्पं
8,22 тыс. подписчиков
1 764 просмотра · 7 дней назад
महायुतीत सगळं काही आलबेल असल्याचं सत्ताधारी नेते सांगत असले, तरी बुलढाणा जिल्ह्यात भाजपा आणि शिवसेनेतील स्थानिक राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले आणि बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यातील वाद आता पक्षविस्तार आणि कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशापुरता मर्यादित राहिलेला नाही. वाढदिवसाच्या कार्यक्रमातील ‘बाप तो बाप रहेगा’ हे गाणं, धनुष्यबाणाचा इशारा, शक्तिप्रदर्शन, बॅनरबाजी आणि त्यानंतर संजय गायकवाड यांनी केलेली टीका यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
कुणाल गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमापासून ते विद्याधर महाले यांच्या वाढदिवसाच्या शक्तिप्रदर्शनापर्यंत नेमका हा वाद कशामुळे वाढतोय? बुलढाण्यातील राजकीय वर्चस्वासाठी भाजपा आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या या संघर्षाचा महायुतीवर काय परिणाम होऊ शकतो?
पाहा संपूर्ण राजकीय विश्लेषण...
#ShwetaMahale #SanjayGaikwad #Buldhana #Mahayuti #BJP #ShivSena #MaharashtraPolitics #BuldhanaPolitics #DevendraFadnavis #PoliticalNews #MaharashtraNews