Перейти к содержимому

मेथीची भाजी | मेथीची भाजी बनवण्याची सोपी पद्धत | Methi Bhaji Recipe | Marathi Recipe 🌿

Life of Mom

0:00 / 0:00

मेथीची भाजी | मेथीची भाजी बनवण्याची सोपी पद्धत | Methi Bhaji Recipe | Marathi Recipe 🌿

146 просмотров · 3 недели назад
Life of Mom
155 подписчиков
146 просмотров · 3 недели назад
मेथीची भाजी | मूग डाळ आणि ओल्या खोबऱ्याची पौष्टिक भाजी 🌿💚 आजच्या पालेभाजी सिरीजमध्ये बनवूया साधी, चविष्ट आणि पौष्टिक मेथीची भाजी. या रेसिपीमध्ये मेथीसोबत मूग डाळ, कांदा, टोमॅटो आणि ओल्या खोबऱ्याचा किस वापरला आहे. अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी ही भाजी रोजच्या जेवणासाठी एकदम परफेक्ट आहे. 😋 🥣 साहित्य : • मेथीची भाजी • मूग डाळ • कांदा • टोमॅटो • ओल्या खोबऱ्याचा किस • हळद • फोडणीसाठी तेल व आवश्यक मसाले • चवीनुसार मीठ 👩‍🍳 कृती : सर्वप्रथम मेथी स्वच्छ धुऊन घेतली आणि त्यानंतर चिरून घेतली. मूग डाळ आधीच शिजवून घेतली. कढईमध्ये फोडणी करून त्यात कांदा परतून घेतला. कांदा परतल्यानंतर हळद, टोमॅटो आणि ओल्या खोबऱ्याचा किस घातला. त्यानंतर चिरलेली मेथी आणि शिजवलेली मूग डाळ घालून सर्व साहित्य छान एकत्र केले. मेथीची पाने मऊ होईपर्यंत भाजी शिजवून घेतली आणि तयार झाली आपली स्वादिष्ट मेथीची भाजी! 🌿💚 ✨ मेथीची भाजी बनवताना माझ्या 4 खास टिप्स : 1️⃣ मेथी आधी धुवा आणि मग चिरा – त्यामुळे धुताना तिचे पाण्यात विरघळणारे काही पोषक घटक कमी होण्याची शक्यता टाळता येते. 2️⃣ मेथीची कोवळी देठंही वापरा – कोवळी देठं फेकून न देता भाजीमध्ये वापरल्याने भाजीचा अपव्यय कमी होतो. 3️⃣ मूग डाळ आधी शिजवून घ्या – त्यामुळे भाजी लवकर आणि छान मऊ होते. 4️⃣ टोमॅटो जरूर वापरा – टोमॅटोमधील Vitamin C मुळे वनस्पतीजन्य iron च्या absorption ला मदत होऊ शकते. अशाच सोप्या, पौष्टिक आणि घरगुती पालेभाज्यांच्या रेसिपीसाठी Life Of Mom ला Subscribe करा. ❤️ #मेथीचीभाजी #MethiBhaji #MethiRecipe #पालेभाजी #पालेभाजीसिरीज #HealthyRecipe #MaharashtrianRecipe #MarathiRecipe #MoongDal #HealthyFood #घरगुतीरेसिपी