Bol Bhidu Diwali Ank 2026 | अनटोल्ड स्टोरीज | Raju Baviskar चित्रकार ते लेखक म्हणून कसे घडले
BolBhidu
0:00 / 0:00
Bol Bhidu Diwali Ank 2026 | अनटोल्ड स्टोरीज | Raju Baviskar चित्रकार ते लेखक म्हणून कसे घडले
456 просмотров · 2 ч назад
BolBhidu
2,92 млн подписчиков
456 просмотров · 2 ч назад
#BolBhidu #DigitalDiwaliAnk2026 #RajuBaviskar
तर भिडू, मराठी माणूस आणि दिवाळी अंक हे पूर्वीपासूनच अगदी जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालंय. दिवाळीत छापील अंक घेऊन वाचण्याचा आनंद हा काही निराळाच असतो. पण काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं तसं वाचनाची जागा व्हिडिओनं म्हणजे बघण्या-ऐकण्यानं घेतलीय. म्हणूनच 'बोल भिडू' यंदा दिवाळी अंकांच्या इतिहासात एक नवा आणि क्रांतिकारी प्रयोग घेऊन आलंय. तो म्हणजे 'बोल भिडू' डिजिटल दिवाळी अंक'...
यात मान्यवरांच्या आठवणी, राजकीय विश्लेषण, कविता, कथाकथन, रिपोर्ताज असं सगळं काही व्हिडिओ स्वरूपात आपल्या 'बोल भिडू'च्या यूट्यूब चॅनेलवर असणार आहे. अर्थात यंदाच्या दिवाळीत मान्यवर साहित्यिक, लेखक, कवी, राजकीय अभ्यासक, विचारवंत, पत्रकार आणि नेते यांचे मौलिक विचार थेट स्क्रीनवर घेऊन आलो आहोत. डिजिटल माध्यमविश्वात बदल घडवू पाहणाऱ्या या पहिल्यावहिल्या डिजिटल दिवाळी अंकातून मान्यवरांच्या विचारांची जादू जगभरातल्या प्रेक्षकांना अनुभवता यावी, अशी आमची मनापासून इच्छा आहे. म्हणूनच आपण हा निखळ अनुभव घ्यावा आणि आपली दिवाळी द्विगुणित व्हावी, याच शुभेच्छा !
तर राजू बाविस्कर हे २०२५ सालचे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक आणि प्रसिद्ध चित्रकार आहेत. त्यांनी या दिवाळी अंकातील 'अनटोल्ड स्टोरीज' या विभागात परिस्थितीमुळे चित्रकार ते लेखक म्हणून झालेल्या जडणघडणीचा काळ उभा केलाय.
'बोल भिडू' हे मराठी डिजिटल मीडियातलं गेली सात-आठ वर्षांपासून एक आघाडीचं माध्यम ठरलंय. गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या घडामोडींची साध्या-सोप्या भाषेत, पण तितक्याच परखड रांगड्या शैलीत सखोल माहिती देणारं यूट्यूब चॅनेल अशी 'बोल भिडू'ची ठळक ओळख निर्माण झालीय. जगभरातल्या गोतावळ्याच्या पाठिंब्यावर आतापर्यंत चॅनेलनं जवळपास ३० लाख सबस्क्रायबरचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठलाय.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/