Перейти к содержимому

अनिरुद्धांचा गणपती – भक्ती, उपासना आणि गणरायाच्या सान्निध्याचा मंगल सोहळा

Aniruddha Bapu All - He and His World (Marathi)

0:00 / 0:00

अनिरुद्धांचा गणपती – भक्ती, उपासना आणि गणरायाच्या सान्निध्याचा मंगल सोहळा

18 063 просмотра · 4 дня назад
Aniruddha Bapu All - He and His World (Marathi)
344 тыс. подписчиков
18 063 просмотра · 4 дня назад
सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या निवासस्थानी गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता, त्याच्या स्वागताचा उत्साह आणि दर्शनाची आस म्हणजे श्रद्धावानांसाठी भक्ती, प्रेम आणि आनंदाने भरलेला एक जिव्हाळ्याचा सोहळा. गजराच्या उत्साही वातावरणात निघालेल्या आगमन सोहळ्याने या उत्सवाची मंगल सुरुवात होते. बाप्पाचे औक्षण करून त्याचे प्रेमाने स्वागत केले जाते आणि गणरायाचे बापूंच्या निवासस्थानी आगमन होते. त्यानंतर विधिवत श्रीगणेश पूजन, विविध उपचारांचे अर्पण आणि नैवेद्याने लाडक्या गणरायाची मनोभावे सेवा केली जाते. सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू श्रीगणेशाचे दर्शन घेतानाचे तसेच गणपती बाप्पासमोर भक्तिभावाने गजर करतानाच्या क्षणांनी या सोहळ्याला आणखी भावपूर्ण बनवले. दीर्घ प्रतीक्षेनंतर समोर येणारे श्रीगणेशाचे प्रसन्न रूप पाहताच प्रत्येक चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित होत होता. बापूंच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर श्रद्धावानांची पावले वळतात श्रीअनिरुद्ध गुरूक्षेत्रम्कडे. तेथे श्री मूलार्क गणेशाचे दर्शन तसेच स्वयंभू गणेश याचे दर्शन ही श्रद्धावान मनोभावे घेत होते. श्रीअनिरुद्ध गुरूक्षेत्रम् मध्ये होणारे दत्तमाला मंत्र पठण या उत्सवाला एक वेगळी आध्यात्मिक अनुभूती देते. आणि अखेरीस येतो पुनर्मिलाप सोहळा... पुन्हा भेटण्याच्या भावनेने गणरायाला निरोप देण्याचा हळवा क्षण. आगमनाच्या आनंदापासून पुनर्मिलापाच्या भावपूर्ण क्षणापर्यंत, ‘अनिरुद्धांचा गणपती’ प्रत्येक श्रद्धावानाच्या मनात अनेक सुंदर आठवणी, भक्तीचा आनंद आणि लाडक्या बाप्पाच्या सान्निध्याची अनुभूती जपून ठेवतो. गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! #AniruddhaBapu #ganpati #ganpatibappamorya #ganpatifestival ©℗ ---------------------------------- Join the WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029Vb9c... For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) - Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddhabapu.in Samirsinh Dattopadhye blog - https://sadguruaniruddhabapu.com Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) - http://www.aniruddhasadm.com https://aniruddha-aadeshpathak.com ----------------------------------