Перейти к содержимому

Sonali Kulkarni | Rationalism | मानियले नाही बहुमता | Narendra Dabholkar Memorial Day #rationalism

Kathan | कथन

0:00 / 0:00

Sonali Kulkarni | Rationalism | मानियले नाही बहुमता | Narendra Dabholkar Memorial Day #rationalism

10 426 просмотров · 3 дн. назад
Kathan | कथन
50,5 тыс. подписчиков
10 426 просмотров · 3 дн. назад
#sonalikulkarni #sokul #NarendraDabholkar #movementsongs #songs #poetry पुण्यातील एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, हॉलमध्ये २० ऑगस्ट २०२६ला डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त 'मानियले नाही बहुमता' हा विशेष कार्यक्रम झाला. विविध संत, समाजसुधारक, कवी, लेखक व पुरोगामी बुद्धिजीवी यांच्या अभंग, कविता व निवडक लिखाणाचे विविध कलाकारांनी सादरीकरण केले. 'वैज्ञानिक दृष्टिकोन व विवेकवाद यावरील कविता व वेच्यांचे अभिवाचन' झाले. अक्षय शिंपी आणि मुकुंद कुळे यांची बांधणी होती. प्रज्ञा दया पवार यांनी 'आली सिंहस्थ पर्वणी' हा तुकाराम महाराजांचा अभंग व कुसुमाग्रजांची 'व्यर्थ गेला तुका' ही कविता सादर केली. विवेकवादाची संकल्पना हा वेचा वाचून दाखवला. विंदा करंदीकर यांचे आधुनिक गुरुस्तवन वाचून दाखवले. मुकुंद कुळे यांनी संत तुकाराम महाराजांचा अभंग व त्यांच्या पत्रकारितेतील प्रसंग सांगितला. केतकी थत्ते यांनी महात्मा फुलेंचा अखंड गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. सोनाली कुलकर्णी यांनी सावित्रीबाई फुलेंचा 'तयास मानव म्हणावे का?' हा अखंड गायला. याशिवाय दाभोलकरांनी समितीच्या दृष्टीने विवेकवाद काय आहे हे सांगितले. सोयराबाईंचा 'देहाची विटाळ' हा अभंग व विवेकवादाच्या विविध समाजसुधारकांच्या व्याख्या सांगितल्या. प्रदीप कोकरे यांनी 'वेदा आधी तू होतास' बाबुराव बागुलांची कविता सादर केली. पर्ण पेठे यांनी बहिणाबाई चौधरींच्या 'लपे कर्माची रेखा' ही रचना सादर केली. कवी यशवंत यांच्या 'ग्रहांचे सहाय्य त्या शुरा, यशश्री पायाची दासी' व नारायण सुर्वे यांची 'मास्तर' कविता सादर केली. या सादरीकरणाच्या मध्ये दाभोलकर यांच्या मूळ आवाजातील ध्वनिफिती प्रेक्षकांना ऐकवण्यात आल्या. #sokul #NarendraDabholkar #movementsongs #songs #NarendraDabholkar #movementsongs #sonalikulkarni #marathipoetry