Перейти к содержимому

मुश्रीफ - महाडिक थेट समोरासमोर

सकलम् - SAKALAAM

0:00 / 0:00

मुश्रीफ - महाडिक थेट समोरासमोर

25 638 просмотров · 18 часов назад
सकलम् - SAKALAAM
14,8 тыс. подписчиков
25 638 просмотров · 18 часов назад
महायुतीमध्ये असणाऱ्या भाजप - शिवसेना शिंदे गट - राष्ट्रवादी अजित पवार गट आणि जनसुराज्य पक्ष यांच्यामध्ये फार काही अलबेल नसल्याचे जाणवतच होत. परंतु आता याचे थेट प्रत्यनंतर आलं आहे. निमित्त ठरलंय खा. धनंजय महाडिक आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी नेमकं निवडणुकीच्या तोंडावर, अगदी अर्ज भरायच्या पूर्व संध्येला एकमेकावर डागलेल्या आरोपांच्या फैरी. त्यामुळे महायुती नावाच्या एकाच छताखाली असणारे हे दोन गट–मुश्रीफ गट आणि महाडिक गट…आता उघडपणे एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. नुकतीच राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना गोकुळ मधील आकड्याची बेरीज मांडली, ज्याने संपूर्ण कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्क लावले जातं आहेत. मुश्रीफ जाहीर केलं की गोकुळमध्ये त्यांच्याकडे ३५०० ठरावांचं बळ आहे. पण या गणितातून त्यांनी आपलाच मित्रपक्ष असलेल्या 'भाजप'ला मात्र पूर्णपणे वगळलं. मुश्रीफांच्या या गुगलीवर काही तासांतच भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी एक सविस्तर पत्रक काढलं आणि मुश्रीफांच्या भूमिकेवर थेट प्रहार केला. कालपर्यंत दबक्या आवाजात चर्चा होती की महायुतीमध्ये सगळं काही आलबेल नाही. पण आता हे शीतयुद्ध संपुष्टात आलं असून, मुश्रीफ आणि महाडिक गट यांच्यातील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण याच राजकीय नाट्याचा आढावा घेणार आहोत. हसन मुश्रीफ असं का म्हणाले? यामागे त्यांची रणनीती काय होती? आणि महाडिकांनी दिलेल्या पत्रातील त्या प्रमुख मुद्द्यांचा खरा अर्थ काय? पाहूया सविस्तर... #GokulElection #गोकुळ_निवडणूक #KolhapurPolitics #कोल्हापूर_राजकारण #GokulDudhSangh #SatejPatil #सतेज_पाटील #BuntyPatil #RajvardhanNimbalkar #राजवर्धन_निंबाळकर #Mahadik #HasanMushrif #ChandrakantPatil #Mahayuti #महायुती #MVA #Congress #BJP #MaharashtraPolitics #PoliticalAnalysis #Sakalaam #सकलम #SakalaamNews #KolhapurNews #KolhapurLive #कोल्हापूर_बातम्या