दीक्षाभूमीवरून मोठा संघर्ष? संविधान चौकात भंते सुरई ससाईंचं आंदोलन #citynews_nagpur
City News Channel
0:00 / 0:00
दीक्षाभूमीवरून मोठा संघर्ष? संविधान चौकात भंते सुरई ससाईंचं आंदोलन #citynews_nagpur
30 451 просмотр · 5 дней назад
City News Channel
393 тыс. подписчиков
30 451 просмотр · 5 дней назад
नागपुरातील दीक्षाभूमीच्या व्यवस्थापनाशी संबंधित वाद पुन्हा चर्चेत आला आहे. विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर देशभरातून मोठ्या संख्येने भीमसैनिक आणि आंबेडकरी अनुयायी दीक्षाभूमीवर येणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर दीक्षाभूमी दक्षता समितीच्या वतीने संविधान चौकात साखळी उपोषण सुरू करण्यात आलं आहे. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते सुरई ससाई हे देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
विलास गजघाटे आणि राजेंद्र गवई यांना हद्दपार करण्याची मागणी समितीने केली असून, मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. दीक्षाभूमीची शांतता आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.
दीक्षाभूमीच्या या वादावर प्रशासन काय भूमिका घेणार? पाहा सिटी न्यूजचा सविस्तर रिपोर्ट.
#Nagpur #Dikshabhoomi #दीक्षाभूमी #BhanteSuraiSasai #संविधानचौक #NagpurNews #CityNews