Перейти к содержимому

कामरगावात अंधाराचे साम्राज्य! २ महिन्यांपासून पथदिवे बंद, चोऱ्या आणि अपघातांनी नागरिक त्रस्त

City News Channel

0:00 / 0:00

कामरगावात अंधाराचे साम्राज्य! २ महिन्यांपासून पथदिवे बंद, चोऱ्या आणि अपघातांनी नागरिक त्रस्त

772 просмотра · 2 дня назад
City News Channel
390 тыс. подписчиков
772 просмотра · 2 дня назад
कामरगावच्या मुख्य रस्त्यावर आणि बस स्थानक परिसरातील पथदिवे गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अमरावती ते कारंजा लाड महामार्गावरील या महत्त्वाच्या परिसरात रात्री अंधारामुळे अपघातांचा धोका वाढला असून चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याचा आरोप व्यापारी आणि ग्रामस्थांनी केला आहे. २० ते २५ गावांसाठी महत्त्वाचे संपर्क केंद्र असलेल्या कामरगाव बस स्थानक परिसरात महिलांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. पथदिव्यांची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल करत नागरिकांनी वरिष्ठ प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. #कामरगाव #पथदिवे #अमरावती #कारंजा #CityNews