कावळागडाचा खतरनाक ट्रेक 😱 | वाट घसरडी, खाली हजारो फूट दरी आणि बिबट्याच्या खुणा | पाय घसरला असता 😢
Suva Vlogs
0:00 / 0:00
कावळागडाचा खतरनाक ट्रेक 😱 | वाट घसरडी, खाली हजारो फूट दरी आणि बिबट्याच्या खुणा | पाय घसरला असता 😢
2 506 просмотров · 8 часов назад
Suva Vlogs
6,99 тыс. подписчиков
2 506 просмотров · 8 часов назад
कावळागडाचा खतरनाक ट्रेक 😱
नमस्कार मित्रांनो! 🙏
आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही केला आहे वरंध घाटातील कावळागडाचा थरारक ट्रेक! माझ्यासोबत आहेत वरंध घाटात हरवलेला ड्रोन शोधल्यामुळे चर्चेत आलेले व्हायरल योगेश दादा आणि माझे मित्र.
या ट्रेकदरम्यान आम्हाला असा अनुभव आला की काही क्षणांसाठी वाटलं, उगाच या ट्रेकला आलो की काय! 😰
🌿 या व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळेल?
✅ वरंध घाटातील कावळागड ट्रेकचा प्रवास
✅ घसरडी वाट आणि पाय घसरण्याचा थरार
✅ एका बाजूला हजारो फूट खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला घनदाट जंगल
✅ झाडांना पकडत पहिल्या पठारापर्यंत केलेली चढाई
✅ कावळागडाच्या पहिल्या पठारावरील सुंदर Drone Shots
✅ सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील मनमोहक Sunset
✅ शिवतरघळ आणि वरंध घाटाचे अप्रतिम दृश्य
✅ योगेश दादांनी दाखवलेल्या बिबट्या बसल्याच्या खुणा आणि जमिनीवरील खोदण्याचे ट्रेस मार्क्स
संध्याकाळ होत असल्यामुळे आम्हाला कावळागडाच्या मुख्य भागापर्यंत जाता आले नाही. मात्र, पहिल्या पठारावरून दिसणारा सह्याद्रीचा नजारा आणि सूर्यास्त मन जिंकणारा होता.
पुढे गवतात दबलेली जागा आणि जमिनीवर दिसलेल्या खुणांमुळे ट्रेकचा थरार आणखी वाढला. योगेश दादांच्या मते, त्या ठिकाणी बिबट्या बसला असावा. मात्र, आम्हाला प्रत्यक्ष बिबट्या दिसला नाही.
हा ट्रेक जितका सुंदर होता, तितकाच आव्हानात्मकही होता. घसरडी वाट, खोल दरी आणि निसर्गाच्या सान्निध्यात आलेला हा अनुभव नक्की पाहा!
व्हिडिओ आवडला तर LIKE करा 👍, CHANNEL SUBSCRIBE करा आणि तुमच्या ट्रेकिंग करणाऱ्या मित्रांसोबत SHARE करा.
📍 Location: वरंध घाट, कावळागड परिसर, सह्याद्री, महाराष्ट्र
#कावळागड #KavalgadTrek #VarandGhat #Trekking #Sahyadri #MarathiVlog #KokanTrek #YogeshDada #DroneShots